Shubman Gill: क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) आणि शुभमन यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तसेच, शुभमनचं नाव अनेक नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) देखील जोडत आहेत. आता शुभमननं डेटिंग अॅपबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
काही दिवसांपूर्वी स्टेडियममधील एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावरील व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती तरुणी हातात एक बोर्ड घेऊन उभी राहिलेली दिसत आहे. 'टिंडर, शुभमन से मॅच करा दो' असं या बोर्डवर लिहिलं आहे.
क्रिकेटपटू उमेश यादवनं देखील ट्विटरवर एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलंय की, "संपूर्ण नागपूर बोलत आहे, शुभमन आता तरी हे बघ" उमेशनं या ट्वीटमध्ये त्या तरुणीच्या व्हायरल फोटोच्या बॅनरचे फोटो शेअर केले.
शुभमन गिलची पोस्ट
शुभमननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हातात बोर्ड धरुन उभ्या असलेल्या तरुणीचा फोटो दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शुभमनची टिंडर प्रोफाईल देखील दिसत आहे. या प्रोफाइलच्या बायोमध्ये 'तेरा हिरो इधर है' असं लिहिलेलं दिसत आहे. आता शुभमनला टिंडरवर किती राईट स्वाईप मिळतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
शुभमन हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. सारा अली खान आणि शुभमन अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच शुभमनचं नाव अनेक नेटकरी सारा तेंडूलकरसोबत देखील जोडत आहेत. त्यामुळे आता शुभमन नक्की कोणाला डेट करतोय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: