Shubman Gill Edited Sanju Samson Photo Fact Check : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताच्या ऐतिहासिक (India Won T20 World Cup) विजयाबरोबरच सोशल मीडियावर एक नवा वादही पेटला आहे. काही पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की शुभमन गिल (Shubman Gill) याने आपल्या अभिनंदनाच्या पोस्टमधून संजू सॅमसनला (Sanju Samson) फोटोमधून एडिट करून काढून टाकले. मात्र इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि या फोटोमागचे खरे कारण काय आहे, ते जाणून घेऊया...

Continues below advertisement

गिलवर सॅमसनचा फोटो हटवल्याचा आरोप

भारताने टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकल्यानंतर गिल यांनी इंस्टाग्रामवर ट्रॉफीसोबत टीमच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये सॅमसन कुठेही दिसत नाहीत. काही क्रिकेट चाहत्यांनी हा फोटो सूर्यकुमार यादवच्या पोस्टमधील फोटोशी तुलना केली. सूर्यकुमारच्या फोटोमध्ये सॅमसन मागे उभा असल्याचे दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर वेगाने चर्चा सुरू झाली की गिल याने जाणीवपूर्वक फोटो एडिट करून सॅमसनला फ्रेममधून हटवले. इतकेच नाही तर काहींनी असा आरोपही केला की सॅमसन ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरल्यामुळे गिल नाराज आहेत, कारण तो स्वतः वर्ल्ड कप संघाचा भाग नव्हता.

Continues below advertisement

फोटो एडिट केल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा.... 

मात्र, तथ्य पडताळणीत हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा ठरतो. तपासात स्पष्ट झाले की गिल याने फोटोमध्ये कोणतीही एडिटिंग किंवा छेडछाड केलेली नाही. सोशल मीडियावर फिरणारा फोटो क्रॉप केल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. गिल याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तोच फोटो शेअर केला आहे, जो त्याला फोटोग्राफर किंवा टीम मॅनेजमेंटने दिला होता. त्या फोटोमध्ये एडिटिंगचे कोणतेही चिन्ह आढळत नाही.

वेगवेगळ्या अँगलमधून आणि वेगवेगळ्या क्षणी काढलेले फोटो 

सामना संपल्यानंतर पोडियमवर सेलिब्रेशन सुरू असताना काही सेकंदांतच अनेक फोटो काढले गेले. त्या क्षणांमध्ये खेळाडूंची उभी राहण्याची जागा आणि ट्रॉफी पकडण्याची पोजिशन सतत बदलत होती. गिल याने जो फोटो शेअर केला, त्या क्षणी सॅमसन दुसऱ्या खेळाडूच्या मागे पूर्णपणे झाकले गेला होता. त्यामुळे तो कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दिसले नाहीत. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव याने पोस्ट केलेला फोटो काही सेकंदांनी काढला गेला होता. त्यावेळी सॅमसन जसप्रीत बुमराहच्या मागून स्पष्ट दिसत होता. म्हणजेच दोन्ही फोटोमध्ये केवळ वेळ आणि कॅमेऱ्याच्या अँगलचा फरक आहे.

इतर खेळाडूंच्या पोस्टमधूनही झाली पुष्टी

या दाव्याला खोटे ठरवणारा सर्वात मोठा पुरावा म्हणजे टीममधील इतर खेळाडूंच्या सोशल मीडिया पोस्ट्स. गिलसह टीममधील अनेक सदस्यांनी हाच फोटो शेअर केला आहे. यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि रविचंद्रन अश्विन यांनीही विजयाबद्दल शुभेच्छा देताना अगदी हाच फोटो पोस्ट केला आहे. या सर्वांच्या पोस्टमधील फोटोमध्येही सॅमसन दिसत नाहीत. यावरून स्पष्ट होते की गिल यांनी कोणालाही फोटोमधून हटवलेले नाही. हा संपूर्ण वाद केवळ गैरसमज आणि वेगळ्या अँगलने घेतलेल्या फोटोमुळे निर्माण झाला आहे.

हे ही वाचा -

BAN vs PAK Video : पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा, बांगलादेशचा हिंदू क्रिकेटर संतापला, म्हणाला, इथे कोणीही चॅरिटी....