Shreyas Iyer Father On Asia Cup 2025 India Squad: जिथे संधी मिळाली, तिथे अव्वल दिलं, आता त्याने काय करावं, मग BCCI निवड करेल? श्रेयस अय्यरच्या वडिलांनी हतबलतेने हात टेकले!
Shreyas Iyer Father On Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यरला आशिया चषकाच्या टी-20 च्या संघात स्थान न दिल्यामुळे सध्या विविध चर्चा रंगल्या आहेत.

Shreyas Iyer Father On Asia Cup 2025 India Squad: आशिया कप 2025 च्या स्पर्धेसाठी (Shreyas Iyer Father On Asia Cup 2025 India Squad) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. आशिय कपच्या या संघात श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) स्थान मिळालेलं नाही. चांगली कामगिरी करुनही श्रेयस अय्यरला आशिया चषकाच्या टी-20 च्या संघात स्थान न दिल्यामुळे सध्या विविध चर्चा रंगल्या आहेत. तसेच अनेक माजी क्रिकेटपटू देखील बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटच्या निवड समितीवर टीका करत आहे. याचदरम्यान, श्रेयस अय्यरचे वडील संतोष अय्यर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना संतोष अय्यर म्हणाले की, टी-20 संघात येण्यासाठी माझ्या मुलाला (श्रेयस अय्यरला) आणखी काय करावे लागेल हे मला माहित नाही. श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सपासून कोलकाता नाईट रायडर्सपर्यंत, तो कर्णधार म्हणून चांगला खेळला. आयपीएल 2024 मध्ये त्याने केकेआरला चॅम्पियन बनवले, त्याने पंजाब किंग्जला अंतिम फेरीत नेले. जरी तो संघाबाहेर असला तरी तो त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दाखवत नाही. तो फक्त म्हणेल - हे माझे नशीब आहे. आता तुम्ही काहीही करू शकत नाही. तो नेहमीच कूल असतो, तो कोणालाही दोष देत नाही पण आतून तो खूप निराश होईल, असं संतोष अय्यर यांनी सांगितले.
Shreyas Iyer's father said "I don’t know what else Shreyas has to do to make it to the Indian T20 team. He has been performing so well in the IPL year after year, from Delhi Capitals to Kolkata Knight Riders to Punjab Kings, and that too as a captain. He even captained KKR to the… pic.twitter.com/qoiIixKqVM
— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2025
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ-
फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.
आशिया कपमधील भारताचे वेळापत्रक-
10 सप्टेंबर - विरुद्ध यूएई (दुबई)
14 सप्टेंबर - विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
19 सप्टेंबर - विरुद्ध ओमान (अबू धाबी)
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना
संबंधित बातमी:
Shubman Gill : शुभमन गिल उपकर्णधार, BCCI ने एकाच दगडात किती पक्षी मारले, कुणाकुणाचे गेम झाले?





















