एक्स्प्लोर

Shreyas Iyer News : टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घेताना श्रेयस बोल बोल बोलला; सगळेच चक्रावले

Shreyas Iyer India T20 Captain : टीम इंडियाचा टी-20 कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची जागा आता श्रेयस अय्यर याने घेतली आहे.

Shreyas Iyer India T20 Captain Statement : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची जागा आता श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने घेतली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अय्यरच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेतृत्वाची धुरा हाती आली असली तरी आपल्या स्वभावात किंवा विचारसरणीत कोणताही बदल करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

“मला माझी व्यक्तिमत्त्व बदलण्याची अजिबात गरज वाटत नाही” - श्रेयस अय्यर

नवीन कर्णधार म्हणून आपल्या नेतृत्वशैलीबद्दल बोलताना अय्यर म्हणाला की, “मला माझी व्यक्तिमत्त्व बदलण्याची अजिबात गरज वाटत नाही. मी जसा आधी होतो तसाच राहणार आहे. कोणाची नक्कल करणे किंवा कोणाच्या सावलीत राहण्याचा प्रयत्न करणे मला मान्य नाही.” अय्यरच्या मते, यशस्वी नेतृत्वासाठी स्वतःची ओळख जपणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे तो आपल्या नैसर्गिक शैलीत संघाचे नेतृत्व करणार असून खेळाडूंशीही त्याच पद्धतीने संवाद साधणार आहे.

मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीने घडवला अय्यर

मुंबईसारख्या क्रिकेटच्या पंढरीत वाढलेल्या अय्यरने आपल्या यशामागील संघर्षाचाही उल्लेख केला. तो म्हणाला की, "मुंबईत प्रत्येक गल्लीत देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणारे अनेक क्रिकेटपटू असतात. अशा स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध करत मी इथपर्यंत पोहोचला आहे." त्यामुळे दबावाच्या परिस्थितीत कसे खेळायचे, संघाला कसे एकत्र ठेवायचे आणि विजयासाठी कशी झुंज द्यायची याचा अनुभव त्याला लहानपणापासूनच मिळाला आहे. त्याचे लक्ष नेहमीच संघाला विजय मिळवून देण्यावर आणि खेळाचा आनंद घेण्यावर केंद्रित राहिले आहे.

टी-20 संघात दमदार पुनरागमन

अय्यरसाठी ही कर्णधारपदाची संधी विशेष मानली जात आहे. डिसेंबर 2023 नंतर तो भारतीय टी-20 संघाच्या योजनांमधून जवळपास बाहेर पडला होता. मात्र, सातत्यपूर्ण कामगिरी आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रभावी प्रदर्शनाच्या जोरावर त्याने जोरदार पुनरागमन केले. विशेष म्हणजे, संघात पुनरागमन करताच त्याच्याकडे थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे निवड समितीचा त्याच्यावर असलेला विश्वास स्पष्ट दिसून येतो.

आयर्लंडविरुद्ध पहिली मोठी परीक्षा

नवीन कर्णधार म्हणून अय्यरची पहिली कसोटी आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लागणार आहे. या मालिकेत त्याच्या नेतृत्वशैलीकडे आणि निर्णयक्षमतेकडे सर्वांचे लक्ष असेल. संघातील वरिष्ठ आणि युवा खेळाडूंमध्ये योग्य समन्वय साधत तो भारताला विजय मिळवून देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, माजी भारतीय कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही निवड समितीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. गांगुली म्हणाले, “श्रेयस अय्यरने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि तो या संधीचा पात्र आहे. सूर्यकुमार यादवला हटवण्याचा निर्णय चुकीचा नाही. निवडकर्त्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे.”

हे ही वाचा -

Manav Suthar Ind vs Afg Test : रवींद्र जडेजाचा वारसदार मिळाला! जड अंतःकरणाने का होईना, क्रिकेट विश्वाने मानव सुथारला ठोकला सलाम; पदार्पणातच 6 विकेट्स घेत रचला इतिहास

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 1st ODI : बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Team India Gautam Gambhir : विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
IND VS ENG ODI Series Schedule : टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
India lose No 1 T20I spot : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Embed widget