India T20I Squad For Ireland and England Series 2026 : आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तीन अत्यंत मोठे निर्णय घेतले आहेत. निवड समितीच्या बैठकीत झालेल्या या निर्णयांनी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरची भारतीय टी-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, अवघ्या काही वर्षांत टी-20 क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवला (SKY) थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय, युवा खळबळ वैभव सूर्यवंशीची संघात निवड करण्यात आली आहे.
सूर्यकुमार यादव युगाचा अंत, थेट संघातून बाहेर (Suryakumar Yadav OUT Team India)
भारतीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सूर्यकुमार यादवचे नाव सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल. एक उत्कृष्ट फलंदाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे स्कायच्या कर्णधारपदाचा आणि टी-20 कारकिर्दीचा एक टप्पा संपल्याचे चित्र आहे. कर्णधार म्हणून सूर्याने 52 सामन्यांमध्ये 42 विजय, टी-20 विश्वचषक आणि आशिया चषक विजेतेपद जिंकले. त्याने कर्णधार म्हणून एकही मालिका गमावली नाही. या महान खेळाडूला संघातून बाहेर केल्याने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त होत आहे.
श्रेयस अय्यरची 'किंग साईज' एन्ट्री, नवा कर्णधार (Shreyas Iyer captain Team India T20I Squads)
गेल्या काही महिन्यांत कमालीचे चढ-उतार पाहिलेल्या श्रेयस अय्यरसाठी हा निर्णय पुनर्जन्मासारखा आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून (Contract) बाहेर पडण्यापासून ते थेट भारतीय टी-20 संघाचा कर्णधार बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. 2024 मध्ये आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) जिंकणारा, तसेच 2025 च्या आयपीएल फायनलमध्ये संघाला नेणारा श्रेयस आता भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व करेल. एकीकडे वन-डे संघाचे उपकर्णधारपद आणि आता टी-20 चे कर्णधारपद मिळवून त्याने संघात आपले स्थान मजबूत केले आहे.
युवा स्टार वैभव सूर्यवंशीची संघात निवड
या मालिकेसाठी बीसीसीआयने भविष्याचा वेध घेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड करून सर्वांना चकित केले आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या वैभवला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी संधी असेल. सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये 16 सामन्यांमध्ये सर्वाधिक 776 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. त्याने एकाच हंगामात सर्वाधिक 72 षटकार मारले आणि त्याचा स्ट्राइक रेट 237.30 होता. वैभवच्या या तुफानी कामगिरीमुळे निवड समितीने त्याला थेट आंतरराष्ट्रीय संघात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR IRELAND SERIES)
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR England SERIES)
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.
आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारतीय टी-20 संघ (India Squad for the Asian Games)
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा -
