Team India T20 Captain: आयपीएल (IPL 2026) संपताच टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची (Team India T20 Captain) जबाबदारी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे सोपवण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे. टी-20 संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खराब फलंदाजीमुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. 

Continues below advertisement

सूर्यकुमार यादवला 2025 मध्ये एकही अर्धशतक झळकवता आले नाहीय. तसेच टी-20 विश्वचषकातही तो चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाला खराब फॉर्मचा फटका बसू नये, त्यामुळे बीसीसीआय सूर्यकुमार यादवला हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्यासारखा पर्यात असताना रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या शिफारशीवरुन सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. 

श्रेयस अय्यरचं नाव आघाडीवर, पण आता हार्दिक पांड्याचीही चर्चा- (Team India T20 Captain)

श्रेयस अय्यर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तसेच आयपीएलमध्ये उत्तर कर्णधारपदही हाताळले. श्रेयस अय्यर हा सूर्यकुमार यादवच्या जागी योग्य पर्याय मानला जात आहे. तसेच तीन वेगवेगळ्या आयपीएल फँचायझींना फायनलपर्यंत नेणारा श्रेयस अय्यर एकमेव कर्णधार आहे.  तर दुसरीकडे टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचाही (Hardik Pandya) विचार सुरु आहे. श्रेयससोबत आता हार्दिक पांड्याच्या नावाचीही बीसीसीआयकडून चर्चा सुरु आहे. आता टीम इंडियाच्या टी-20 संघाचं कर्णधारपद कोणाला मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारापदाबाबत ट्विस्ट आल्याची चर्चा रंगली आहे.

Continues below advertisement

IPL च्या पलीकडेही श्रेयस अय्यर एक उत्कृष्ट कर्णधार- (Shreyas Iyer)

श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाबाबत होणारी प्रशंसा केवळ 'इंडियन प्रीमियर लीग'पुरतीच मर्यादित नाही. 2024 मध्ये, मुंबईने आपल्या इतिहासात दुसऱ्यांदा 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी' जिंकली—हा एक ऐतिहासिक विजय होता, जो श्रेयस अय्यरच्याच कर्णधारपदाखाली साकार झाला. असे दिसून येते की, कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच, अय्यरची वैयक्तिक कामगिरीही बहरते; किंबहुना, 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी'च्या (SMAT) त्याच हंगामात, त्याने 9 सामन्यांमध्ये एकूण 345 धावा कुटल्या होत्या. 2018-19 च्या देशांतर्गत हंगामात त्याने मुंबई संघाचे नेतृत्व केले होते. शिवाय, त्याने 'इंडिया-ए' (India 'A') संघाचेही नेतृत्व केले असून, त्या भूमिकेतही त्याने लक्षणीय यश संपादन केले आहे. अशा प्रकारे, हे स्पष्ट होते की श्रेयस हा केवळ IPL च्या झगमगाटातच एक असाधारण कर्णधार ठरलेला नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Team India : श्रेयसच्या नावाची फक्त चर्चा, पण चेन्नईचा सलामीवीर होणार टीम इंडियाचा कर्णधार?, बीसीसीआयच्या एका निर्णयाने फिरवलं चक्र; आगरकरांच्या मनांत नक्की चाललंय काय?