एक्स्प्लोर

Shoaib Akhtar On Mohsin Naqvi Ind vs Pak T20 World Cup 2026: अज्ञानी, अयोग्य, उद्ध्वस्त...शोएब अख्तर मोहसीन नक्वीला कधीही न वापरलेले शब्द बोलून गेला!

Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानचा पराभव होताच शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2026) भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी (India vs Pakistan) पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र पाकिस्तानचा संघ केवळ 114 धावांवर सर्वबाद झाला. भारतविरुद्धच्या या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

एबीपी न्यूजशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, आता असा एक व्यक्ती आहे ज्याला हे देखील माहित नाही की तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे. जेव्हा तुम्ही अयोग्य आणि अज्ञानी व्यक्तीला नोकरी देता तेव्हा तो तुमचा देश उद्ध्वस्त करतो. तो कोणत्याही संघटनेला पाडू शकतो. याचे उदाहरण तुमच्यासमोर आहे. तुम्ही हे समजून घेण्याइतके हुशार आहात, असं शोएब अख्तरने सांगितले. जेव्हा तुम्ही अशा लोकांना स्टार बनवता, तेव्हा तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागतो, असंही शोएब अख्तर एबीपी न्यूजसोबत बोलताना म्हणाला. (Shoaib Akhtar On Mohsin Naqvi)

शोएब अख्तरने शाहीन अफ्रिदीलाही सुनावले- (Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026)

तुम्ही भारतीय असो किंवा पाकिस्तानी, तुम्हाला हे मान्य करावेच लागेल की भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे. जर कोणता संघ त्यांना रोखू शकत असेल तर तो कदाचित इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असेल. पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळला, त्याप्रमाणे पाकिस्तान सामन्यात कुठेही नव्हता. आम्हाला शाहीन शाह आफ्रिदीकडून 23 धावांची गरज नाही, आम्हाला त्याच्याकडून विकेटची गरज आहे, असं म्हणत शोएब अख्तरने शाहीन अफ्रिदीसह पाकिस्तानचा चांगलेच सुनावले. पाकिस्तान कोणत्याही प्रकारे आधुनिक क्रिकेट खेळत नाही. भारत पुढील 100 वर्षांचे क्रिकेट खेळत आहे किंवा पुढील 50 वर्षांचे क्रिकेट आता खेळत आहे. पाकिस्तान खूप वाईट क्रिकेट खेळत आहे आणि जेव्हा या फॉरमॅटचा (टी-20 आंतरराष्ट्रीय) विचार केला जातो तेव्हा ते खूप मागे आहेत, हे वारंवार स्पष्ट होतंय, असं शोएब अख्तरने सांगितले. 

सामना कसा राहिला? (India vs Pakistan T20 World Cup 2026)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात सॅम अयुब आणि सलमान आगा यांना बाद करून पाकिस्तानला धक्का दिला. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.

संबंधित बातमी:

Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: भारत विश्वचषक जिंकायला...शोएब अख्तर पाकिस्तानला सुनावले, नको नको ते बोलला!

Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
IND vs ENG : भारत की इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोण जिंकणार? आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते?
IND vs ENG : भारत की इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोण जिंकणार? आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते?
Pakistan : टी 20 वर्ल्ड कपमधून सुपर 8 मध्येच पाकिस्तानवर गाशा गुंडाळण्याची वेळ, शाहिद आफ्रिदी संतापला, नव्या कर्णधाराचं नाव सुचवलं
आक्रमक खेळाडूकडे कर्णधारपद द्या, पाकच्या टी 20 वर्ल्डकप मधील कामगिरीवर शाहिद आफ्रिदी नाराज, नवं नाव सांगितलं...
T20 World Cup 2026: भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसानं रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण पोहोचणार? ICC चा नियम काय सांगतो?
भारत- इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसानं रद्द झाल्यास काय? अंतिम फेरीत कोण पोहोचणार? ICC चा नियम काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Accident News: मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
Nagpur Blast News: नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
Embed widget