Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन झाले आहे. आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत शेन वॉर्न यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाला त्यांनी अनेक सामन्यांमध्ये यश मिळवून दिले आहे. शिवाय आयपीएलमध्येही शेन वॉर्न यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली होती. वर्ष 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती.
एप्रिल 2008 पासून आयपीएलच्या स्पर्धा खेळण्यास सुरूवात झाली. त्याआधी फेब्रुवारीमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला होता. या लिलावात केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केलेल्या खेळाडूंवरच बोली लावण्यात आली होती. तर लिलावापूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग यांना 'आयकॉन प्लेयर्स' म्हणून फ्रँचायझींचा भाग बनवण्यात आले होते. याचवेळी राजस्थानने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती.
2008 ला शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, लेगस्पिनच्या या जादूगाराला विकत घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक होते. लीगची सर्वात स्वस्त फ्रेंचायझी असलेल्या राजस्थान रॉयल्सने 4 लाख 50 हजार डॉलर्सच्या बोलीसह शेन वॉर्नला आपल्या संघात सहभागी करून घेतले होते.एवढेच नाही तर राजस्थानने त्यांना आपल्या संघाचा कर्णधार बनवले होते.
आयपीएलचा पहिला हंगाम सुरू झाला होता, त्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या संघाला सर्वात कमकुवत संघ मानला जात होता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ, भारतीय फलंदाज मोहम्मद कैफ, अष्टपैलू युसूफ पठाण यांच्याशिवाय इतर कोणीही संघात सुपरस्टार नव्हता. परंतु, शेन वॉर्नच्या सक्षम कर्णधारपदाच्या कामगिरीवर संघाने अंतिम फेरीत घडक मारली होती. त्यानंतर या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले. तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला उपविजेते पद मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या
Shane Warne Passes Away : फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन