Pakistan T20 World Cup 2026 : शाहिद आफ्रिदी भडकला! स्वतःच्याच जावयाला नको नको ते बोलले, शेवटी पाकिस्तान क्रिकेटचा मोठा निर्णय, टीममधूनचं काढलं
Shaheen Afridi dropped Pakistan playing XI : पाकिस्तान संघाने नामिबियाविरुद्धच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Pakistan vs Namibia T20 World Cup 2026 : पाकिस्तान संघाने नामिबियाविरुद्धच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि फिरकीपटू अबरार अहमद (Abrar Ahmed) यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे अबरार हा सध्या जगातील अव्वल टी-20 गोलंदाजांपैकी एक (क्रमांक 3) मानला जातो, तरीही त्याला बाहेर बसवण्यात आले.
भारताविरुद्धच्या सामन्यात दोघांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली होती. त्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापन नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या जागी सलमान मिर्झा आणि ख्वाजा नफे यांना संधी देण्यात आली आहे. या बदलामुळे पाकिस्तानची फलंदाजी आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न दिसून येतो. मात्र कर्णधार सलमान अली आगा (Salman Ali Agha) यांनी या निर्णयामागचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही.
शाहीन आफ्रिदीचा निराशाजनक फॉर्म
सध्याच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये शाहीन आफ्रिदीने 3 सामन्यांत केवळ 3 बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 11.22 इतका महागडा ठरला. भारताविरुद्धच्या सामन्यात तर त्याने अवघ्या 2 षटकांत 31 धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीका वाढली होती.
दुसरीकडे, माजी कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) फलंदाजीही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारताविरुद्ध तो केवळ 5 धावांवर बाद झाला होता. स्पर्धेत त्याने 22 च्या सरासरीने फक्त 66 धावा केल्या आहेत. तरीदेखील त्याला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
शाहिद आफ्रिदींची उघड टीका
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यानेही शाहीनला संघाबाहेर करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे शाहीन हा त्याचा जावई असूनही त्याने उघडपणे टीका केली. तसेच मोहम्मद युसूफ यांनीही शाहीन, बाबर आणि शादाब यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा सल्ला दिला होता.
शाहिद आफ्रिदीचा संताप, नेमकं काय म्हणाला होता?
पाकिस्तानी न्यूज चॅनलवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “शाहीन, बाबर आणि शादाबला बाहेर करा. मोठ्या सामन्यांमध्ये त्यांनी वारंवार निराशाजनक कामगिरी केली आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी द्या आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवा.” आता सर्वांच्या नजरा नामिबियाविरुद्धच्या सामन्याकडे लागल्या आहेत. जर बाबर आजम या सामन्यातही अपयशी ठरला, तर त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
पाकिस्तान संघाची प्लेइंग इलेव्हन : साहिबजादा फरहान, सॅम अय्यूब, सलमान आगा, बाबर आजम, उस्मान खान, ख्वाजा नफे, शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, सलमान मिर्झा आणि उस्मान तारिक.
हे ही वाचा -





















