Ravi Shastri On Team India T20 Captain: आयपीएल (IPL 2026) संपताच टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची (Team India T20 Captain) जबाबदारी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे सोपवण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे. टी-20 संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खराब फलंदाजीमुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच श्रेयस अय्यरसोबत संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नावाचा देखील बीसीसीआयकडून विचार सुरु आहे. याचदरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू रवी शास्त्री (Ravi Shastri On Team India T20 Captain) यांनी देखील टीम इंडियाच्या कर्णधारपदावर भाष्य केलं आहे.

संजू सॅमसनमध्ये सुरुवातीपासूनच क्षमता आहे, पण तो अलीकडे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि पुढील दोन ते तीन वर्षांत आणखी प्रभावी कामगिरी करून दाखवेल, असं रवी शास्त्री यांनी (Ravi Shastri On Team India T20 Captain) सांगितले. सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर अवलंबून, भारताला पुढील टी-20 विश्वचषक (2028) पर्यंत नवीन कर्णधाराची गरज भासू शकते. पण राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केल्यामुळे संजू सॅमसनने कर्णधारपदासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. संघामध्ये संजूचे स्थान सुरक्षित आहे. तो डावाच्या सुरुवातीला फलंदाजी करतो आणि एक अत्यंत आक्रमक फलंदाज आहे, त्यामुळे मला वाटते की ही फक्त सुरुवात आहे आणि पुढील 2-3 वर्षांत तुम्हाला संजूकडून बरेच काही पाहायला मिळेल, असं रवी शास्त्री म्हणाले. (Ravi Shastri On Team India T20 Captain)

संजू सॅमसनने सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला- रवी शास्त्री (Ravi Shastri On Team India T20 Captain)

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, संजू सॅमसनच्या कामगिरीतील सातत्य ही समस्या वाटत नाही. सॅमसनने त्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच क्षमता होती. तो आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकला नाही म्हणून चाहते निराश झाले होते, असं रवी शास्त्रींनी सांगितले. तसेच टी-20 विश्वचषकातील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, तो ज्याप्रकारे या हंगामात आयपीएलमध्ये खेळत आहे, त्यामुळे तो कर्णधारपदासाठी एक प्रबळ दावेदार बनला आहे. आयपीएलमध्ये तो जी परिपक्वता दाखवत आहे, ते पाहता माझा विश्वास आहे की संजू सॅमसन भविष्यात कर्णधारपदासाठी एक प्रबळ आणि स्पष्ट दावेदार बनला आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.

श्रेयस अय्यरचं नाव आघाडीवर, पण आता हार्दिक पांड्याचीही चर्चा- (Team India T20 Captain)

श्रेयस अय्यर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तसेच आयपीएलमध्ये उत्तर कर्णधारपदही हाताळले. श्रेयस अय्यर हा सूर्यकुमार यादवच्या जागी योग्य पर्याय मानला जात आहे. तसेच तीन वेगवेगळ्या आयपीएल फँचायझींना फायनलपर्यंत नेणारा श्रेयस अय्यर एकमेव कर्णधार आहे.  तर दुसरीकडे टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचाही (Hardik Pandya) विचार सुरु आहे. श्रेयससोबत आता हार्दिक पांड्याच्या नावाचीही बीसीसीआयकडून चर्चा सुरु आहे. आता टीम इंडियाच्या टी-20 संघाचं कर्णधारपद कोणाला मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारापदाबाबत ट्विस्ट आल्याची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातमी:

Team India T20 Captain: टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारापदाबाबत ट्विस्ट; श्रेयस अय्यरची चर्चा सुरु असताना अचानक आणखी एका खेळाडूची एन्ट्री