AUS vs SA Final : WTC फायनलमध्ये पुन्हा आलं रबाडा नावाचं वादळ, पण स्टार्कनं केला मोठा गेम; ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दिलं 282 धावांचं लक्ष्य
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर संपला आहे. जेतेपद जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावा कराव्या लागतील.

South Africa vs Australia WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर संपला आहे. जेतेपद जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावा कराव्या लागतील. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 212 धावा केल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त 138 धावांवर संपला. आता जर दक्षिण आफ्रिकेला जिंकायचे असेल तर त्यांना सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या करावी लागेल.
A change in approach for a long-awaited ICC trophy 💪
— ICC (@ICC) June 13, 2025
Ricky Ponting's advice to the Proteas as they think about their #WTC25 Final chase 📝https://t.co/wgfpBui3z9
ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने ठोकले अर्धशतक
ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात मिचेल स्टार्कने अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने 73 धावांत 7 विकेट गमावल्या. त्यानंतर अॅलेक्स कॅरीने 43 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाने 148/9 वरून 207 धावांपर्यंत मजल मारली. मिचेल स्टार्कने 136 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी खेळली. जोश हेझलवूडने 53 चेंडूत 17 धावा केल्या. शेवटच्या विकेटसाठी दोघांमध्ये 59 धावांची भागीदारी झाली.
A formidable final-wicket partnership from Australia sets a daunting target for the Proteas to chase 🔥
— ICC (@ICC) June 13, 2025
Follow the action LIVE ➡️ https://t.co/pQ7yVByD1d pic.twitter.com/qZhp8Dzqsq
लॉर्ड्सवर फक्त 4 वेळा पार झाला 200+ रन चेस
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आतापर्यंत 147 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये चौथ्या डावात फक्त चार वेळा 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पाठलाग करण्यात आले आहे. 2005 नंतर येथे फक्त एकदाच 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्यात आले आहे. 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या डावात 279 धावा करून इंग्लंडने विजय मिळवला. या मैदानावर सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. 1984 मध्ये वेस्ट इंडिजने शेवटच्या डावात एका विकेटने 344 धावा करून कसोटी जिंकली.
इंग्लंडमध्ये तिसऱ्या दिवशी फलंदाजी करणे सोपे...
पण, असे नाही की ऑस्ट्रेलियाचा विजय पूर्णपणे निश्चित झाला आहे. दक्षिण आफ्रिका चौथ्या डावात फलंदाजी करत आहे, पण खेळपट्टी फारशी खराब झाली नाही. आज सामन्याचा फक्त तिसरा दिवस आहे. इंग्लंडमधील कसोटीचा तिसरा दिवस फलंदाजीसाठी सर्वात चांगला मानला जातो. यामुळेच दक्षिण आफ्रिका सामन्यातून पूर्णपणे बाहेर पडले नाही. पण, दक्षिण आफ्रिकेवर चोकरचा लेबल आहे. यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.
A blockbuster Day 3 of #WTC25 Final awaits 👀
— ICC (@ICC) June 13, 2025
Follow the action LIVE here ⬇️https://t.co/pQ7yVBzaQL
हे ही वाचा -




















