Priyansh Arya Run Out IND A vs SL A : अजब-गजब रनआऊट... श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज आणि प्रियांश खेळपट्टीच्या एकाच टोकावर; पुढे काय घडलं? VIDEO
Priyansh Arya Run Out VIDEO : श्रीलंका 'अ' विरूद्ध भारत 'अ' यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिंरगा मालिकेतील पहिल्याच सामन्यात एक अजब-गजब रनआऊट पाहायला मिळाला.

Priyansh Arya Run Out Sri Lanka A vs India A 1st Match Tri Nation A Series : श्रीलंका 'अ' विरूद्ध भारत 'अ' यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिंरगा मालिकेतील पहिल्याच सामन्यात एक अजब-गजब रनआऊट पाहायला मिळाला. रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. भारताने अवघ्या 17 धावांवर आपले दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. या कठीण परिस्थितीत कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि प्रियांश आर्य यांनी संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सांभाळला. मात्र, सेट झालेला प्रियांश आर्य एका चुकीमुळे रनआऊट झाला आणि भारताची चांगली चाललेली भागीदारी संपुष्टात आली.
अजब-गजब रनआऊट... नेमकं काय घडलं? (Ruturaj Gaikwad-Priyansh Arya Run Out)
रविंदु फर्नांडोच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. तिथला क्षेत्ररक्षक अतिशय निवांत चेंडू पकडण्यासाठी जात होता. हे पाहून तिथे सहज दोन धावा घेण्याची संधी होती. ऋतुराजने दुसरी धाव घेण्यासाठी प्रियांशला कॉल दिला. प्रियांशनेही सुरुवातीला होकार देत धावण्यास सुरुवात केली. प्रियांशचा होकार मिळाल्यामुळे ऋतुराज चेंडूकडे पाहत वेगाने धावला.
पण प्रियांशने अचानक आपला निर्णय बदलला आणि तो मध्येच थांबला. दुसरीकडे, ऋतुराज चेंडूकडे पाहत असल्याने त्याला प्रियांश थांबल्याचे समजलेच नाही. जेव्हा ऋतुराज स्ट्रायकर एंडच्या क्रिजजवळ पोहोचला, तेव्हा त्याला प्रियांश तिथेच उभा असलेला दिसला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने चेंडू हातात घेण्यापूर्वीच ऋतुराजने दुसरी धाव पूर्ण करत क्रिज गाठली होती.
Priyansh Arya gave a call to Ruturaj for 2nd run then backed off but karma hit instantly, keeper blocked his bat and Arya got out 😭😭#INDAvsSLA pic.twitter.com/pNNicubc9K
— سهيل (@tweetsbysohaill) June 9, 2026
ऋतुराज आणि प्रियांश खेळपट्टीच्या एकाच टोकावर, नियम काय सांगतो? (Ruturaj Gaikwad-Priyansh Arya IND A vs SL A)
नियम असा सांगतो की, जर दोन्ही फलंदाज एकाच टोकाला असतील, तर जो फलंदाज आधी क्रिजमध्ये पोहोचतो तो सुरक्षित मानला जातो. ऋतुराजने प्रियांशच्या आधी क्रिजमध्ये बॅट टेकवली होती. प्रियांशला वाटले की जर आपण ऋतुराजच्या आधी बॅट क्रिजमध्ये टेकवली, तर आपण सुरक्षित होऊ. त्याने प्रयत्न केला, पण डिकवेलाचा पाय मध्ये आल्यामुळे प्रियांशची बॅट रेषेच्या आत जाऊ शकली नाही. यष्टीरक्षक डिकवेलाने चेंडू हातात घेऊन तिथेच बेल न उडवता, चेंडू थेट दुसऱ्या टोकाला (नॉन-स्ट्रायकर एंडला) गोलंदाज रविंडू फर्नांडोकडे फेकला आणि फर्नांडोने बेल उडवून प्रियांशला रनआऊट केले.
प्रियांशची विकेट अन् भारताला धक्का
प्रियांश आर्य 32 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 32 धावा केल्या. पण स्वतःच्याच गोंधळामुळे त्याला विकेट गमवावी लागली. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, जर प्रियांश धावला असता तर दोघांनीही सहज दोन धावा पूर्ण केल्या असत्या. यामुळे तिसऱ्या विकेटची 62 धावांची भागीदारी तुटली आणि भारताला मोठा धक्का बसला.
हे ही वाचा -




















