RR vs SRH IPL 2026 : जयपूरमध्ये हैदराबादचा 'सूर्योदय'; वैभव सूर्यवंशीचे शतक व्यर्थ, राजस्थानचा पराभव
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएलच्या 19व्या हंगामातील 36व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे.
किरण महानवरLast Updated: 25 Apr 2026 11:33 PM

पार्श्वभूमी
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएलच्या 19व्या हंगामातील 36व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई...More
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएलच्या 19व्या हंगामातील 36व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान पराग करत आहेत, तर सनरायझर्स हैदराबादची धुरा पुन्हा एकदा ईशान किशन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 7:00 वाजता होणार आहे. राजस्थान रॉयल्स आपल्या घरच्या मैदानावर वर्चस्व कायम राखण्याच्या उद्देशाने उतरणार असून, मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचीही त्यांची तयारी असेल. या टप्प्यावर दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण दोघेही गुणतालिकेत महत्त्वाचे गुण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.याआधी 13 एप्रिलला झालेल्या सामन्यात हैदराबादने प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानला 57 धावांनी पराभूत केले होते. मात्र, त्या पराभवानंतर राजस्थानने लखनऊविरुद्ध 40 धावांनी विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले आहे. सध्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद चढ-उतारांनी भरलेल्या कामगिरीनंतर चौथ्या स्थानी आहे.हेड-टू-हेड आकडेवारीराजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 22 सामने झाले आहेत. यामध्ये हैदराबादचा वरचष्मा दिसून येतो. हैदराबादने 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थानला 9 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ- (IPL 2026 RR Full Squad)रवींद्र जडेजा, सॅम करन, डोनोवन फरेरा, संदीप शर्मा, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, लुआन-ड्राईस प्रिटोरियस, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), युधवीर सिंग चरक, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, क्विना मफाका, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, सुशांत मिश्रा, यशराज पुंजा, विघ्नेश पुथूर, रवी सिंग, अमन राव, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिल्ने, कुलदीप सेनसनरायझर्स हैदराबादचा संघ- (IPL 2026 SRH Full Squad)पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मृती, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, जीशान अंसारी, शिवांग कुमार, सलिल अरोरा, साकिब हुसैन, ओंकार तरमाळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेट्रा, लियाम लिविंगस्टोन, शिवम मावी, जैक एडवर्ड्सहे ही वाचा -S. Sreesanth on Harbhajan Singh: 'त्यानं एक कोटी कमावलेत..' 18 वर्षांपूर्वीच्या वादाला नव्याने फोडणी; आयपीएलमध्ये कानाखाली खालेल्या श्रीसंतनं हरभजनला इन्स्टावर ब्लॉक का केलं? पुन्हा का भडकला?
RR vs SRH IPL 2026 : जयपूरमध्ये हैदराबादचा 'सूर्योदय'; वैभव सूर्यवंशीचे शतक व्यर्थ, राजस्थानचा पराभव
इशान मलिंगाच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या भेदक कामगिरीनंतर, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला.
शनिवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने वैभव सूर्यवंशीचे शतक आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत सहा गडी गमावून 228 धावा केल्या.
प्रत्युत्तर, सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकांत पाच गडी गमावून 229 धावा केल्या आणि सामना जिंकला.