RR vs RCB Live Score Update : गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीचे वादळ; राजस्थानचा बंगळुरूवर दणदणीत विजय
RR vs RCB Live Cricket Score Updates Marathi News : रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार असून हा थरारक मुकाबला गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.

पार्श्वभूमी
IPL 2026 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru LIVE Update In Marathi : आयपीएल 2026 मधील 16वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार असून हा थरारक मुकाबला...More
आयपीएल 2026 च्या 16 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला 6 गडी राखून पराभूत केले. गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रजत पाटीदाराला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 18 षटकांत 4 गडी गमावून 202 धावा करत सामना जिंकला.
राजस्थान रॉयल्सने सामन्याची सुरुवात जबरदस्त करत अवघ्या 8 ओव्हर्समध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात 129 धावा ठोकल्या.
वैभव सूर्यवंशी याने तुफानी फलंदाजी करत 25 चेंडूत 78 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
त्याला ध्रुव जुरेल याचीही दमदार साथ मिळाली. जुरेलने 15 चेंडूत 38 धावा करत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
मात्र, या धडाकेबाज सुरुवातीनंतर सामना अचानक फिरला. सूर्यवंशी 26 चेंडूत 78 धावा करून बाद झाला.
त्यानंतर लगेचच शिमरन हेटमायर शून्यावर माघारी परतला. या दोघांनाही क्रुणाल पांड्या याने बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला.
यानंतर राजस्थानची घसरगुंडी सुरूच राहिली.
रियान पराग 5 चेंडूत केवळ 3 धावा करून बाद झाला. अवघ्या 5 धावांच्या अंतरात राजस्थानचे 3 विकेट्स पडले आणि त्यांच्या तुफानी गतीला अचानक ब्रेक लागला.
11 ओव्हर्सनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोअर 4 विकेट्सच्या बदल्यात 141 धावा असा आहे.
जुरेल 20 चेंडूत 41 धावांवर खेळत आहे, तर रवींद्र जडेजा 6 चेंडूत 6 धावांवर आहे.
राजस्थानला विजयासाठी आता 54 चेंडूत 61 धावांची गरज आहे, त्यामुळे सामना आता रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे.