एक्स्प्लोर

Rohit Sharma Virat Kohli Meets Ind vs Aus: विराट कोहलीला बघताच रोहित शर्माकडून सॅल्यूट; टीम बसमध्ये पोहोचताच..., व्हिडीओने सर्वांची जिंकली मनं

Rohit Sharma Virat Kohli Meets Ind vs Aus: टीम इंडिया काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली. यावेळी दिल्ली विमानतळावर विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व खेळाडू दाखल झाले होते.

Rohit Sharma Virat Kohli Meets Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus Series 2025) यांच्यात एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडिया काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली. यावेळी दिल्ली विमानतळावर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मासह (Rohit Sharma) सर्व खेळाडू दाखल झाले होते. अनेक महिन्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र दिसले. यादरम्यान, दिल्ली विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा विराट कोहलीला सॅल्यूट मारताना (Rohit Sharma Virat Kohli Meets) दिसत आहे. 

भारताचा एकदिवसीय संघ काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाला. टीम बसमध्ये येत असताना रोहित शर्माने विराट कोहली आधीच बसमध्ये बसलेला असल्याचे पाहिले. विराट कोहलीला बघताच रोहित शर्माने त्याला सॅल्यूट केला. यानंतर रोहित शर्मा बसमध्ये पोहोचला आणि विराट कोहलीला मिठी मारली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा (Rohit Sharma Virat Kohli Ind vs Aus) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

शुभमन गिलने घेतली रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भेट- (Shubhman Gill Meet Rohit Sharma-Virat Kohli)

टीम इंडिया ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघाले, त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीकडे (Virat Kohli) सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांची भेट झाली. शुभमन गिल आधी रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार होता. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआयने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून शुभमन गिलची निवड केली. या सगळ्या प्रकरणानंतर काल रोहित शर्मा आणि शुभमन गिल पहिल्यांदाच (Rohit Sharma Shubhman Gill Meets) समोरासमोर आले. यावेळी शुभमन गिलने रोहित शर्माला थेट मिठी मारली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलमध्ये चांगला संवादही झाला. यानंतर टीम बसमध्ये बसलेल्या विराट कोहलीची देखील शुभमन गिलने भेट घेतली. यावेळी विराट कोहलीला देखील शुभमन गिलने (Virat Kohli Shubhman Gill Meet) हात मिळवत मिठी मारली.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs Aus ODI And T20 Schedule)

पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)

दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अ‍ॅडलेड ओव्हल)

तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)

पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)

दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)

तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)

चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)

पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)

शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India T20 Squad vs Australia)

सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

संबंधित बातमी:

Rohit Sharma Shubhman Gill Ind vs Aus: एकदिवसीय कर्णधारपदी निवड...रोहित शर्मा समोर येताच शुभमन गिलने काय केलं?, VIDEO 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget