Rohit Sharma to retire from Test cricket after BGT 2024 : श्रीलंकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला, तेव्हा टॉम लॅथमचा संघ तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा नायनाट करेल असे क्वचितच कुणाला वाटले असेल. पण भारतीय संघाला घरच्या मैदानावर पहिल्यांदाच अशा दुर्दैवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे 12 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आणि त्यानंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू आणि चाहते टीम इंडियाच्या खेळाडूंना घेरले आहेत. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) देखील कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील 6 डावात 91 धावा करणाऱ्या रोहित शर्माबाबत कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी मोठे वक्तव्य केले. श्रीकांत म्हणाले की, जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करता आली नाही तर, त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी.
त्याच्या यूट्यूब शोमध्ये श्रीकांत यांनी भाकित केले की, "तुम्हाला पुढचा विचार करायला सुरुवात करावी लागेल. जर रोहित शर्माने चांगली कामगिरी केली नाही, तर मला वाटते की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तो फक्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याने आधीच टी-२० क्रिकेट सोडले आहे. आम्हालाही करावे लागेल. त्याचे वयही वाढत आहे हे लक्षात ठेवा.
रोहित शर्माशिवाय श्रीकांत यांनी विराट कोहलीच्या कारकिर्दीवर बरेच काही सांगितले. कोहली ऑस्ट्रेलियात चांगले पुनरागमन करेल, असा त्याला विश्वास आहे. श्रीकांत म्हणाला, "माझ्या मते, विराट कोहली ऑस्ट्रेलियात शानदार पुनरागमन करेल. ऑस्ट्रेलियात त्याला धावा करायला आवडतात, हीही त्याची ताकद आहे. कोहलीने आता क्रिकेट सोडावे, असे म्हणणे कदाचित घाईचे आहे. निवृत्ती स्वीकारण्यासाठी कोहली अजून बराच वेळ शिल्लक आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचे दोन स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बॅट्स पूर्णपणे शांत होत्या. दोन्ही खेळाडूंना 6 डावांत 100 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. विराट कोहलीला 6 डावात 15.50 च्या सरासरीने फक्त 93 धावा करता आल्या, तर हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने 6 डावात 15.16 च्या सरासरीने 91 धावा केल्या.
हे ही वाचा -