Rohit Sharma Shubhman Gill Ind vs Aus: एकदिवसीय कर्णधारपदी निवड...रोहित शर्मा समोर येताच शुभमन गिलने काय केलं?, VIDEO
Rohit Sharma Shubhman Gill Ind vs Aus: टीम इंडिया ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघाले, त्यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांची भेट झाली.

Rohit Sharma Shubhman Gill Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यात एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडिया (टीम इंडिया) काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली. तर आज सकाळी टीम इंडियाचे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले.
टीम इंडिया ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघाले, त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीकडे (Virat Kohli) सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांची भेट झाली. शुभमन गिल आधी रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार होता. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआयने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून शुभमन गिलची निवड केली. या सगळ्या प्रकरणानंतर काल रोहित शर्मा आणि शुभमन गिल पहिल्यांदाच (Rohit Sharma Shubhman Gill Meets) समोरासमोर आले. यावेळी शुभमन गिलने रोहित शर्माला थेट मिठी मारली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलमध्ये चांगला संवादही झाला. यानंतर टीम बसमध्ये बसलेल्या विराट कोहलीची देखील शुभमन गिलने भेट घेतली. यावेळी विराट कोहलीला देखील शुभमन गिलने (Virat Kohli Shubhman Gill Meet) हात मिळवत मिठी मारली. यादरम्यानचे सर्व फोटो आणि व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केले आहेत.
𝙀𝙣 𝙧𝙤𝙪𝙩𝙚 𝘿𝙤𝙬𝙣 𝙐𝙣𝙙𝙚𝙧 ✈️
— BCCI (@BCCI) October 15, 2025
Of familiar faces and special reunions as #TeamIndia depart for the Australia challenge 😍#AUSvIND pic.twitter.com/ElV3OtV3Lj
भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs Aus ODI And T20 Schedule)
पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)
दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अॅडलेड ओव्हल)
तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)
पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)
दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)
तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)
चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)
पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India T20 Squad vs Australia)
सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
















