Rohit Sharma IND vs ENG 1st ODI : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू बर्मिंगहॅम (Birmingham) शहर फिरण्यासाठी बाहेर पडले. 14 जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या वनडेपूर्वी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवण्यासाठी खेळाडूंनी हा छोटासा ब्रेक घेतला. या दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Continues below advertisement

रोहित शर्माला पाहताच चाहत्यांची गर्दी

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि कुलदीप यादव बर्मिंगहॅमच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हे खेळाडू फारशा सुरक्षा व्यवस्थेशिवाय शहरात फिरत होते. मात्र, रोहित शर्मा दिसताच चाहत्यांनी त्याच्याभोवती मोठी गर्दी केली. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडवली.

Continues below advertisement

वनडे मालिकेसाठी रोहित सज्ज 

याआधी भारतीय संघाच्या सराव सत्रातील काही व्हिडीओही समोर आले होते. त्यामध्ये रोहित शर्मा वनडे मालिकेसाठी कसून तयारी करताना दिसला. टी-20 मालिकेत झालेल्या क्लीन स्वीपनंतर भारतासाठी ही वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, रोहित शर्मासाठीही ही मालिका खास आहे. इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणारा भारतीय सलामीवीर बनण्यासह अनेक वैयक्तिक विक्रम करण्याची संधी त्याच्यासमोर आहे.

टी-20 पराभवाचा वचपा काढण्याची संधी

श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे इंग्लंडविरुद्ध 12 वर्षांनंतर टी-20 मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. विशेषतः कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरसाठी हा पराभव अधिक वेदनादायी ठरला. आता वनडे मालिकेत दमदार कामगिरी करून टी-20 मालिकेतील अपयश विसरण्याची आणि इंग्लंडकडून पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी भारतीय संघासमोर आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव

IND vs ENG ODI मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

14 जुलै 2026 : पहिला ODI, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (3:30 दुपारी)16 जुलै 2026 : दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ (5:30 संध्याकाळी)19 जुलै 2026 : तिसरा एकदिवसीय, लॉर्ड्स, लंडन (3:30 संध्याकाळी)

हे ही वाचा -

Eng vs Ind 1st ODI Playing XI : रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI