एक्स्प्लोर

Rohit Sharma Retirement: गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांना ओरडणारा निघून गेला; रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सर्व भारतीय भावूक

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर सर्व चाहते भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. 

Rohit Sharma Retirement: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Retirement) याने काल (7 मे) कसोटीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. रोहित शर्माने (Rohit Sharma) अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर सर्व चाहते भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. 

रोहित शर्माने अनेक मुलाखतींमध्ये वन-डे आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र काल इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट टाकून कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. रोहित शर्माच्या या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर भारतीय भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांना ओरडणारा निघून गेला...सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत निवृत्ती घेतली, असं नेटकरी भावनिक गाणं टाकत म्हणत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pankaj Yadav (@roxy_pankaj_yadav6664)

रोहित काय म्हणाला?

इन्स्टाग्रामवर कसोटी कॅपसह फोटो शेअर करीत रोहितने लिहिले, सर्वांना नमस्कार...मी केवळ शेअर करू इच्छितो की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी फार सन्मानाची बाब ठरली. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी वनडेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. दरम्यान बीसीसीआयने देखील एक व्हिडीओ शेअर करत रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित शर्माची कसोटी कारकीर्द कशी राहिली?

रोहित शर्मा याने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने तेव्हापासून गेली 12 कसोटी संघांचं प्रतिनिधित्व केलं. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4 हजार 302 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं होतं. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.

संबंधित बातमी:

Rohit Sharma Retirement News : पहिल्याच सामन्यात शतक... मग आयुष्यात पाहिले अनेक चढ उतार, नंतर बनला टीम इंडियाचा राजा, अशी राहिली हिटमॅन रोहित शर्माची कसोटी कारकीर्द

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Jasprit Bumrah MI vs PBKS IPL 2026: तुझ्यानुसार नव्हे माझ्यानुसार...हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद; नेमकं काय घडलं?
तुझ्यानुसार नव्हे माझ्यानुसार...हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद; नेमकं काय घडलं?
Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026: कॅच ऑफ द सीझन...श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO
कॅच ऑफ द सीझन...श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO
Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026: कॅच ऑफ द सीझन...श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO
कॅच ऑफ द सीझन...श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Hardik Pandya: मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
मोठी बातमी : केस पिकले, शरीर थकले, प्रकृती बिघडली; रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नव रुप समोर Video
मोठी बातमी : केस पिकले, शरीर थकले, प्रकृती बिघडली; रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नव रुप समोर Video
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
Shreyas Iyer Catch Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Embed widget