Team India Players Felicitation in Vidhan Bhavan : तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने टी20 विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. टीम इंडियाचे देशभरातून कौतुकाचे वर्षाव होत आहे. या विजयात महाराष्ट्रातीलही खेळाडूंचा मोठा वाटा आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैयस्वाल टीम इंडियाचे सदस्य होते. या सर्वांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना रोहित शर्माने आपल्या खास शब्दात भाषण केले. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या झेलवरुन केलेल्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला.  बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं, असं  मस्करीत रोहित शर्मा म्हणाला. 


रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला ? 


सर्वांना माझा नमस्कार.. इथं बोलवल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप आभार... आमच्यासाठी असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार... काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. 2023 मध्ये संधी थोडक्यात हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही... सर्वांमुळे हे सिद्ध झालं. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हे होऊ शकले. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता.बरं झालं   सूर्यकुमार यादव याच्या हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे घरी बसवले असते. सर्वांचे खूप खूप आभार...



सूर्यकुमार यादव - 


इथं असलेल्या सर्वांना भेटून चांगले वाटते.  हा प्रसंगही मी कधीच विसरु शकत नाही. सर्वांचे खूप खूप आभार... माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाहीत, असे सूर्या म्हणाला.  सूर्यकुमार यादवने यावेळी मुंबई पोलिसांचं कौतुक केले. त्याशिवाय आपण आणखी एका विश्वचषक नावावर करु, असा विश्वास व्यक्त केला. अखेरच्या षटकातील झेलबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला की... झेल हातात बसला...


विश्वविजेत्यांचा सत्कार - 


विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील खेळाडूंचा आज विधिमंडळात सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, यशस्वी जैयस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सपोर्ट स्टाफमधील गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित होते. यावेळी टीम इंडियाचे चारही खेळाडू भारावून गेले होते. 


आणखी वाचा :


Team India : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार; कर्णधार रोहित शर्मासह सूर्या, शिवम आणि यशस्वीचा गौरव