Shubman Gill Double Century : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलने दमदार द्विशतक झळकावलं. त्याने 149 चेंडूत 208 धावांची खेळी खेळली. त्याच्या या द्विशतकानंतर आता रोहित शर्माचं (Rohit Sharma) अडीच वर्ष जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


या ट्वीटमध्ये शुभमन गिलच्याने जवळपास अडीच वर्षांपूर्वी रोहितला ट्वीट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, ज्यावर रोहितने रिप्लायमध्ये Thanks Future असं लिहिलं होतं. ज्यानंतर आता शुभमननेही रोहितप्रमाणेच द्विशतक ठोकत एका दमदार खेळीचं प्रदर्शन केलं आहे. त्याच्या या खेळीमुळे सर्वजण शुभमनवर कौतुकाचा वर्षाव करत असून रोहितने जणू आधीच शुभमनमधील टॅलेंट ओळखलं होतं असं त्याच्या या ट्वीटवरुन दिसत आहे. 


रोहितचं व्हायरल होणारं ते ट्वीट






 


वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन पाचवा भारतीय


एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा पाचवा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी सचिन, सेहवाग, रोहित आणि ईशान यांनी हा पराक्रम केला आहे. रोहितने वनडेमध्ये तीन द्विशतकं झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनदा हा करिष्मा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. अशा परिस्थितीत जेव्हा शुभमन गिलने द्विशतक झळकावले, तेव्हा चाहत्यांनी रोहितचे हेच जुने ट्वीट शेअर करण्यास सुरुवात केली आहे.


शुभमनची एकदिसीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी सुरुच


शुभमन गिलने आतापर्यंत 19 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 68.87 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करणारा तो भारतीय ठरला आहे. शुभमनच्या नावावर सध्या 1102 धावा आहेत. त्याच्या छोट्या कारकिर्दीत त्याने 3 शतकं आणि 5 अर्धशतकं केली आहेत.


सामन्यात शुभमन-रोहितचे खास रेकॉर्ड


भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात शुभमननं द्विशतक झळकावत अनेक विक्रम नावावर केले. पण त्यापूर्वीच त्याने शतक पूर्ण केलं असतानाच एकदिवसीय सामन्यात 1000 धावांही पूर्ण केल्या. त्याने केवळ 19 डावात हा टप्पा गाठत विराट आणि शिखर या दिग्गजांना मागे टाकलं. या दोघांनी 24 डावात ही कमाल केली होती. पण गिलने 19 डावात 1000 धावा करत हा रेकॉर्ड मोडला आहे. दुसरीकडे रोहितने एकदिवसीय सामन्यांच्या 74 डावांत 124 षटकार ठोकले आहेत. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याला मागे टाकलं आहे. धोनी भारतासाठी 123 षटकार ठोकले होते.


हे देखील वाचा-