एक्स्प्लोर

Rohit Sharma Promo Viral : रोहित खोटारड्या... हिटमॅनच्या नव्या शोच्या प्रोमोवरून पेटला वाद; विराट कोहली फॅन्स भडकले, नेमकं काय म्हणाला टीम इंडियाचा स्टार? VIDEO

Rohit Sharma New Show Promo Viral : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता लवकरच टेलिव्हिजनच्या दुनियेत एका नव्या अंदाजात दिसणार आहे.

Rohit Sharma New Show Promo Viral : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता लवकरच टेलिव्हिजनच्या दुनियेत एका नव्या अंदाजात दिसणार आहे. सोनी टीव्हीवर त्याचा फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा हा गेमिंग शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची घोषणा झाल्यापासूनच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, शो प्रसारित होण्यापूर्वीच त्याच्या एका प्रोमोवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. या प्रोमोमध्ये रोहित शर्मा त्याचा सहकारी क्रिकेटपटू शिखर धवन आणि शोचा होस्ट मनीष पॉल यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. यावेळी त्याने 2014-15 मध्ये झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यानचा एक किस्सा सांगितला.

रोहितने नेमकं काय सांगितलं? (Rohit Sharma New Show Promo Viral)

रोहित शर्माने सांगितल्यानुसार, त्यावेळी तो गोलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्यासोबत त्याची बाचाबाची झाली होती. या प्रसंगात शिखर धवनने आपली साथ दिली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर तो ठामपणे उभा राहिला, असा दावा रोहितने प्रोमोमध्ये केला आहे. मात्र, रोहितचा हा किस्सा समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विराटच्या चाहत्यांचा रोहितवर आरोप

विराट कोहलीच्या चाहत्यांच्या मते, रोहित ज्या घटनेचा उल्लेख करत आहे, ती प्रत्यक्षात विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात घडली होती. या दाव्याच्या समर्थनार्थ काही चाहत्यांनी त्या काळातील जुने व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळे रोहित शर्माने चुकीची माहिती दिल्याचा आरोप काही चाहत्यांकडून केला जात आहे. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर रोहित आणि विराटच्या चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, हा केवळ शोचा प्रोमो असल्याने संपूर्ण संदर्भ अद्याप समोर आलेला नाही. प्रोमोमध्ये रोहितने नेमक्या कोणत्या घटनेचा उल्लेख केला किंवा त्याने तो किस्सा कोणत्या संदर्भात सांगितला, हे संपूर्ण भाग प्रसारित झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकते.

19 सप्टेंबरपासून शो प्रेक्षकांच्या भेटीला

वादाच्या पार्श्वभूमीवरही ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या शोची उत्सुकता कायम आहे. हा वीकेंड गेमिंग शो असून त्यामध्ये क्रिकेटसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होताना दिसणार आहेत. या शोचा पहिला भाग 19 सप्टेंबरपासून सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे. दरम्यान, प्रोमोवरून सुरू झालेल्या या वादावर रोहित शर्मा किंवा शोच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा -

Virat Kohli Meets Eknath Shinde : लंडनमध्ये विराट कोहलीचा मराठमोळा सन्मान; एकनाथ शिंदेंनी शाल-पुष्पगुच्छ देत केला सत्कार, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? पाहा VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वन डे क्रिकेटमधील 498 धावांचा विक्रम मोडणार, आता 500 धावाही होणार, माजी अष्टपैलू खेळाडूचा खळबजनक दावा
वन डे क्रिकेटमधील 498 धावांचा विक्रम मोडणार, आता 500 धावाही होणार, माजी अष्टपैलू खेळाडूचा खळबजनक दावा
Virat Kohli On Nana Patekar: नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget