Rohit Sharma Video News : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताचा पहिला सामना खेळला गेला, आणि याच सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक वेगळीच भावना अनुभवायला मिळाली. कारण पहिल्यांदाच टी-20  विश्वचषकात टीम इंडियाकडून रोहित शर्मा खेळताना दिसला नाही. शनिवार 7 फेब्रुवारी रोजी अमेरिका विरुद्ध झालेल्या सामन्यासाठी रोहित शर्मा वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित होता.

रोहित शर्मा आयसीसीचा ब्रँड अँबॅसिडर

मात्र, यावेळी तो खेळाडू म्हणून नाही, तर आयसीसीचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून मैदानात उतरला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही त्याची नवी भूमिका होती. पण या नव्या भूमिकेतही रोहित शर्माचं मन मात्र अजूनही ड्रेसिंग रूममध्येच अडकलेलं दिसून आलं.

टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना पाहून रोहित शर्मा भावूक 

वानखेडेच्या मैदानावर टी-20 विश्वचषक ट्रॉफी हातात घेऊन उभा असताना, रोहितच्या चेहऱ्यावर भावनांचा गोंगाट स्पष्ट दिसत होता. “ड्रेसिंग रूम खूप मिस करतोय… इथे उभं राहिल्यावर विचित्र वाटतंय,” असे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हा क्षण स्पष्टपणे ऐकू येतो. या सामन्याआधी रोहितने नव्या कर्णधार सूर्यकुमार यादवला गुरुमंत्रही दिला होता, नाणेफेक जिंकल्यास प्रथम क्षेत्ररक्षण घ्यावं. मात्र भारताने टॉस हरला आणि रोहितचं म्हणणं खरं ठरलं. भारताची अवस्था एकावेळी 77 धावांत 5 विकेट्स अशी झाली होती.

व्हिडीओमध्ये रोहित पुढे म्हणतो, “इथे येणं नेहमीच खास असतं. मुंबईकरांचं क्रिकेटवरचं प्रेम कधीच कमी पडत नाही. कधी कधी या सगळ्या गडबडीत आपण त्या क्षणाचा आनंद घ्यायचं विसरतो. प्रत्येक सामना, प्रत्येक क्षण एन्जॉय करायला हवा. कारण हे क्षण पुन्हा कधीच परत येत नाहीत. भारतात खेळणं कधीच सोपं नसतं.”

तो पुढे भावूक होत म्हणतो, “हा अनुभव खूप इमोशनल आहे. कारण अजूनही मला मैदानाच्या या बाजूला उभं राहायची सवय नाही. माझं शरीर जणू सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. तिथे उभं राहून राष्ट्रगीत म्हणणं हा वेगळाच अनुभव आहे.” 

हे ही वाचा -

Ind vs Pak : भारताविरुद्धच्या बॉयकॉटवर PCB–ICC मध्ये चर्चा, पाकिस्तानची नवी खेळी; बांगलादेश बोर्डसोबत गुप्त बैठक?