एक्स्प्लोर

India vs Pakistan : पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रम समोर येताच रोहित शर्माने काय केलं?, VIDEO ने धुमाकूळ

India vs Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

India vs Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी (India beat Pakistan) दणदणीत विजय मिळवला. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यानंतर मात्र भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन (NO Handshake) केले नाही. आशिया कप 2025 पासून टीम इंडियाने स्वीकारलेली ही नो हँडशेक भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रोहित-वसीमची गळाभेट (Rohit Sharma and Wasim Akram hugging)

सामन्यापूर्वी मात्र अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. माजी भारतीय कर्णधार आणि टी-20 विश्वचषक 2026 चा ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा कोलंबो येथे उपस्थित होता. त्याने आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता आणि पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) सोबत ट्रॉफी मैदानात आणली. या वेळी रोहित आणि वसीम अक्रम यांची गळाभेट झाली, दोघांनी हसत-गप्पा मारल्या. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि चाहत्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या.

मग भारतीय संघाने हस्तांदोलन का टाळले? (India vs Pakistan T20 World Cup 2026)

रोहित शर्मा वसीम अक्रम यांना मिठी मारू शकतात, तर सध्याचा भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन का करू शकत नाही? हा प्रश्न क्रिकेटविश्वात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

हर्षा भोगले यांची टिप्पणी (Harsha Bhogle on Ind vs Pak NO Handshake)

प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले Harsha Bhogle यांनी भारत-पाकिस्तान सामन्यांच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. ते म्हणाले, “पूर्वी भारत-पाकिस्तान सामने म्हणजे भावनांचा रोलरकोस्टर असायचा. प्रत्येक चेंडूसोबत आशा-निराशेचे चढ-उतार जाणवायचे. विजय केवळ स्कोअरबोर्डवर नसायचा, तो मनात घर करून राहायचा, पराभवही दीर्घकाळ टोचत राहायचा. पण आता तो गहिरा भावनिक स्पर्श कमी होत चालला आहे.”

भोगले यांनी पुढे सांगितले की, क्रिकेट हळूहळू मोठ्या राजकीय अजेंड्याचा भाग बनत आहे. भू-राजकीय प्रश्नांना खेळापेक्षा जास्त महत्त्व मिळू लागले आहे. सामन्याभोवती राष्ट्रवाद आणि राजकीय संदेशांचे वातावरण तयार होते, तर खेळाडू केवळ त्या मोठ्या चित्रातील एक भाग बनून राहतात.

संजय मांजरेकर यांची टीका 

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही ‘नो हँडशेक’ धोरणावर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “ही ‘नो हँडशेक’ गोष्ट भारताने सुरू केलेली अनावश्यक बाब आहे. आपल्या देशाला हे शोभत नाही. खेळभावनेने खेळायचे असेल तर नीट खेळा, अन्यथा खेळूच नका.”

 हे ही वाचा -

T20 World Cup 2026 Points Table : टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson T20 World Cup 2026: हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Team India Victory Parade In Mumbai: विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
Abhishek Sharma T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; न्यूझीलंडविरुद्ध सगळे रेकॉर्ड मोडले!
टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; कुणाची बॅट घेऊन मैदानात उतरला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूसच, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूसच, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Embed widget