नवी दिल्ली : टीम इंडियाचा फिरकीपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) एका पॉडकास्टमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीवर भाष्य केलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं यापूर्वीच टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मानं निवृत्ती जाहीर केली होती. टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा कोण घेणार या बाबतच्या चर्चा सुरु असताना अमित शर्माला शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अमित मिश्रानं एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर दिलं.
अमित मिश्रा काय म्हणाला?
अमित मिश्रा म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली येत्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एखादा क्रिकेटर 35-36 वर्षांपर्यंत खेळतो, असंही तो म्हणाला. टीम इंडियाच्या कॅप्टनपदाबाबत विचारलं असता टी 20 क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या कॅप्टन असावा, असं अमित मिश्रानं म्हटलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळतील का असा प्रश्न विचारला असता रोहित शर्मा आपल्याला खेळताना दिसणार नाही. मात्र, विराट कोहली पाहायला मिळू शकतो ,असं मत अमित मिश्रानं व्यक्त केलं.
रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सकडून पुन्हा खेळायला हवं का असा सवाल देखील अमित मिश्राला विचारण्यात आला यावर अमित मिश्रानं उत्तर दिलं. रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन करत असतील तर त्यानं मुंबईकडून खेळावं. मुंबई इंडियन्स सोबत रोहित शर्माचं भावनिक नातं आहे, असं देखील मिश्रा म्हणाला.
आयपीएलमुळं भारतीय क्रिकेटचं नुकसान झालंय का असा प्रश्न विचारलं असता अमित मिश्रानं आपल्याला पर्याय निर्माण झाल्याचं म्हटलं. रोहित शर्मा आणि अमित मिश्रा यांच्यापैकी कोण पहिल्यांदा निवृत्त होईल, असं विचारलं असता त्यानं स्वत:चं नाव घेतलं.
अमित मिश्रानं या पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर भाष्य केलं.रोहित शर्मासोबतचा एक किस्सा देखील अमित मिश्रानं सांगितला.रोहित शर्मानं लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये वय विचारलं होतं. अमित मिश्रानं त्यावेळी जे घडलं तो किस्सा सांगितला. प्रशिक्षकानं एक वर्षानं वय कमी केल्याचं देखील अमित मिश्रानं म्हटलं. रोहित शर्मा सर्वांचा मित्र आहे. तो सर्वांसोबत गप्पा मारतो, असं देखील अमित मिश्रानं म्हटलं.
संबंधित बातम्या :