Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला. दरम्यान, विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनासह मैदानात उपस्थित असणाऱ्या रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेहच्या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा फायनलआधीचा नरेंद्र मोदी मैदानातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा आणि रितिका कोणत्यातरी गंभीर विषयावर बोलताना दिसत आहे. तर रितिका रोहितसोबत काहीतरी बोलताना दिसत असून, तिचा अंदाज पाहून दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. रोहित आणि रितिकामध्ये कोणत्यातरी विषयावरुन भांडण झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. 

कोण आहे रितिका सजदेह?

रितिका सजदेह भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी असून त्या एक यशस्वी स्पोर्ट्स मॅनेजर आहेत. त्यांचा जन्म 21 डिसेंबर 1987 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बॉबी सजदेह आणि आईचे नाव टीना सजदेह आहे. रितिकाने आपल्या करिअरची सुरुवात स्पोर्ट्स मॅनेजमेंट क्षेत्रात केली आणि त्यांनी Cornerstone Sport & Entertainment या कंपनीमध्ये स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम केले. या कामामध्ये खेळाडूंचे ब्रँड एंडोर्समेंट, जाहिरातींचे करार आणि इतर व्यावसायिक व्यवहारांचे व्यवस्थापन करणे यांचा समावेश असतो. रितिका आणि रोहित शर्मा यांची पहिली भेट सुमारे 2008 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ती प्रेमात बदलली. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रोहित शर्माने 3 जून 2015 रोजी मुंबईतील बोरीवली स्पोर्ट्स क्लब येथे रितिकाला लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर 13 डिसेंबर 2015 रोजी दोघांचा विवाह झाला. रितिका अनेकदा रोहित शर्माच्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये त्यांना प्रोत्साहन देताना दिसतात आणि सोशल मीडियावरही त्या सक्रिय आहेत. रोहितच्या यशामागे रितिका सजदेह यांचा मोठा वाटा मानला जातो.

संबंधित बातमी:

Shoaib Akhter On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरचं विधान चर्चेत; म्हणाला, रोहित-विराटला बाहेर काढलं आणि आता...

Gautam Gambhir Ind vs NZ Final T20 World Cup 2026: 2 भारतीय दिग्गजांना मी हा विश्वचषक समर्पित करतो...; गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, नेमकं काय म्हणाला?