Rishabh Pant Injury Update Eng vs Ind 4th Test : इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे सुरू असलेल्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. संघाचा प्रमुख यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे निवृत्त (रिटायर्ड हर्ट) झाला. त्याने 48 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या होत्या.

Continues below advertisement




ही घटना भारताच्या डावातील 68व्या षटकात घडली. क्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. षटकातील चौथ्या चेंडूवर बॉल सरळ पंतच्या पायावर आदळला. चेंडू लागताच पंत वेदनेत ओरडला. संघाचा फिजिओ मैदानात धावत आला. त्याने पंतचं बूट काढून पाहिलं असता, उजव्या पायाच्या लहान बोटातून रक्त येत असल्याचं आणि पाय सुजल्याचं दिसून आलं.




वेदना असह्य झाल्यानं पंत रिटायर्ड हर्ट 


दुखापत एवढी गंभीर होती की पंतच्या चेहऱ्यावर स्पष्ट वेदना झळकत होत्या. तो नीट चालूही शकत नव्हता, त्यामुळे त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताची धावसंख्या 67.4 षटकांत 3 बाद 212 अशी होती. पंतची अवस्था इतकी गंभीर होती की त्याला मैदानात उपलब्ध अ‍ॅम्ब्युलन्समधून थेट पवेलियनमध्ये नेण्यात आलं.




पंतच्या जागी त्यानंतर रवींद्र जडेजाने फलंदाजीस सुरुवात केली. आपल्या 37 धावांच्या खेळीत पंतने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. विशेष म्हणजे, याच खेळीदरम्यान त्याने इंग्लंडच्या भूमीवर आपल्या कसोटी कारकीर्दीतील 1000 धावा पूर्ण केल्या. 


मँचेस्टर कसोटीत ऋषभ पंत पुन्हा फलंदाजीला येणार? 



या मालिकेत ऋषभ पंतला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहचा वेगवान बाउन्सर पंतच्या बोटाला लागला, ज्यामुळे तो संपूर्ण सामन्यात विकेटकीपिंग करू शकला नाही. पण, त्याने फलंदाजी केली. त्यानंतर मँचेस्टर कसोटीत त्याच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स निर्माण झाला. परंतु पंतला रिटायर हर्ट करावे लागले. म्हणजेच तो तंदुरुस्त होऊन पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. पण त्याची दुखापत किती गंभीर आहे, यासाठी आपल्याला बीसीसीआयच्या अपडेटची वाट पहावी लागेल.





हे ही वाचा -


Eng vs Ind 4th Test : चेंडूचा इम्पॅक्ट स्टंपच्या बाहेर, तरीही शुभमन गिल OUT का? स्टोक्सच्या चेंडूनं पुन्हा गोंधळात टाकलं, VIDEO