Rishabh Pant Steps Down as LSG Captain : आयपीएल 2026 संपल्यानंतर अनेक फ्रेंचायझींमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः काही मोठ्या नावांच्या कर्णधारांवर आता गंडांतर आले असून पुढील हंगामात अनेक संघ नव्या नेतृत्वासह मैदानात उतरू शकतात. सर्वात मोठा धक्का लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला बसला आहे. संघाच्या अत्यंत खराब कामगिरीनंतर पंतने स्वतःच कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असून फ्रेंचायझीने ती मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.
ऋषभ पंतने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं (Rishabh Pant LSG IPL 2026)
ऋषभ पंतसाठी आयपीएल 2026 हा हंगाम पूर्णपणे निराशाजनक ठरला. लखनऊ सुपर जायंट्स गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर राहिली. पंतची फलंदाजीही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. 14 सामन्यांत त्याने फक्त 312 धावा केल्या. त्याची सरासरी 28.3 इतकी होती, तर स्ट्राइक रेट 140 च्याही खाली राहिला. संपूर्ण मोसमात त्याला केवळ एकच अर्धशतक करता आले. त्यामुळे नेतृत्वासोबतच त्याच्या संघातील भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हार्दिक पांड्याही कर्णधारपद सोडण्याची इच्छा केली व्यक्त (Hardik Pandya Mumbai Indians IPL News)
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याही सध्या चर्चेत आहे. रिपोर्टनुसार हार्दिकने स्वतः फ्रेंचायझीला कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मानसिक थकवा आणि सततच्या दुखापतींमुळे तो त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर पुढील हंगामात तो मुंबई इंडियन्स सोडून दुसऱ्या संघाकडून खेळू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे.
अक्षर पटेलचाही पत्ता होणार कट? (Axar Patel Delhi Capitals IPL 2026)
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलच्याही नेतृत्वावर संकट आले आहे. दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही आणि अक्षरलाही वैयक्तिक कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्याने 173 धावा आणि 11 विकेट्स घेतल्या, मात्र संघाला निर्णायक सामने जिंकवण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे दिल्ली पुढील हंगामात नवीन कर्णधार शोधू शकते.
केकेआर-सीएसके कर्णधार बदलणार? (Will KKR and CSK Change Captains?)
कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावरही दबाव वाढला आहे. रहाणेने 14 सामन्यांत 335 धावा केल्या, पण संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात तो अपयशी ठरला. त्याच्या वाढत्या वयामुळे केकेआर आता युवा नेतृत्वाचा विचार करू शकते. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यासाठीही हंगाम खराब गेला. त्याने 337 धावा केल्या, मात्र स्ट्राइक रेट फक्त 123.44 राहिला. संघालाही प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे सीएसके व्यवस्थापन पुढील हंगामात कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -
