Sunil Gavaskar Request Rishabh Pant To Do Backflip Celebration : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने इतिहास रचला आहे. पंतने धमाकेदार शतकी खेळी खेळली. पंतने फक्त 130 चेंडूत शतक झळकावले. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या गोलंदाजीवर एक धाव घेत पंतने आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियात पंतला मूर्ख, मूर्ख, मूर्ख म्हणणाऱ्या गावसकर यांनी त्याला बॅकफ्लिप करून आनंद साजरा करण्यास सांगितले.
'अरे मार की कोलांटी उडी...', स्टँडमधून गावसकरांचा असा इशारा, पण...
27 वर्षीय पंतने या सामन्यात दुसऱ्यांदा शतक ठोकून, कसोटीत एकाच सामन्यात दोन शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मान पटकावला. इतक्या खास कामगिरीसाठी सेलिब्रेशनही तितकंच खास हवं होतं. शतक पूर्ण करताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले.
यादरम्यान, कॅमेरा थेट वळला सुनील गावसकर यांच्याकडे जे मिडिया बॉक्सच्या बाहेर उभं राहून पंतचं ऐतिहासिक शतक पाहत होते. हे क्षण खरंच हृदयस्पर्शी होते, विशेषतः त्यांच्या दोघांच्या अलीकडील नात्याच्या पार्श्वभूमीवर. ऑस्ट्रेलियातील मालिकेत बेफिकीर फलंदाजीबद्दल गावसकरांनी पंतला थेट सुनावलं होतं.
पण या वेळी पंतच्या दुसऱ्या ऐतिहासिक शतकी खेळीला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी शतक पूर्ण केल्यानंतर पंतला थेट कोलांटी उडी सेलिब्रेशन कर असा पंतला केला. पंतने इशार्याने सांगितलं, 'पुढच्या वेळी नक्की!'
पंतने ठोकले ऐतिहासिक शतक
पंतने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात 140 चेंडूत सुमारे 85 च्या स्ट्राईक रेटने 118 धावांची खेळी खेळली. या डावात पंतने 15 चौकार आणि तीन षटकार मारले. पंतने हे शतक ठोकून इतिहास रचला. पंतने या सामन्याच्या पहिल्या डावातही शतक ठोकले. पंतने पहिल्या डावात 134 धावा केल्या. या काळात एका कसोटीत दोन शतके ठोकणारा पंत पहिला भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ठरला.
पंतचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 8 वे शतक आहे. पंत या कसोटीत यष्टिरक्षक म्हणून भारतासाठी सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू ठरला. या काळात पंतने एमएस धोनीचा विक्रम मोडला. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके ठोकली आहेत. त्याच वेळी, पंतकडे आता कसोटीत 8 शतके आहेत.
हे ही वाचा -