Priya Saroj VIDEO : रिंकू सिंग सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत व्यस्त असताना, इकडे त्याच्या होणाऱ्या पत्नी प्रिया सरोजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया सरोज स्टेजवर अस्वस्थ झालेल्या दिसतात. त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहता त्या क्षणभर घाबरल्यासारख्या वाटतात. हा व्हिडीओ जौनपूरमधील असल्याचे सांगितले जात असून, नेमकं असं काय घडलं की सर्वांच्या उपस्थितीत प्रिया सरोज अस्वस्थ झाल्या, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
रिंकू सिंगच्या पत्नीसोबत स्टेजवर काय घडलं?
समाजवादी पार्टीच्या नेत्या आणि जौनपूरच्या मच्छलीशहर मतदारसंघाच्या खासदार असलेल्या प्रिया सरोज या केराकत येथील दंगल स्पर्धेत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान मंचावर बसलेल्या असताना अचानक एक विचित्र प्रकार घडला आणि काही क्षणांसाठी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसून आला.
अनोळखी पुरुष बाजुला खेटून बसला अन्...
व्हायरल व्हिडीओनुसार, प्रिया सरोज मंचावर बसलेल्या असताना त्यांचा एक समर्थक त्यांच्याजवळ येतो आणि शेजारील खुर्चीवर बसण्याची परवानगी मागतो. प्रिया सरोज यांनी राजकीय नेत्याच्या सवयीप्रमाणे नम्रपणे हात जोडून त्याचे स्वागत केले आणि बसण्यास सांगितले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र खुर्चीवर बसल्यानंतर त्या समर्थकाची देहबोली आणि वागणूक पाहून प्रिया सरोज थोड्या अस्वस्थ झालेल्या दिसतात. हाच क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला असून, तोच सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. पण, व्हिडीओ पाहता असे वाटते की संबंधित समर्थकाने जाणीवपूर्वक त्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला नसावा, कदाचित ते अनावधानाने घडले असावे.
रिंकू सिंगसोबत साखरपुडा झाला...
प्रिया सरोज या समाजवादी पार्टीच्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग यांच्याशी त्यांचा साखरपुडा आधीच पार पडला आहे. मात्र दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यावरून सुरू झालेली चर्चा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
कोण आहेत प्रिया सरोज?
प्रिया सरोज या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात तरुण महिला खासदारांपैकी एक ठरल्या आहेत. अवघ्या 25 व्या वर्षी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर जौनपूर जिल्ह्यातील मच्छलीशहर मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. त्या एका राजकीय घराण्यातून आलेल्या असून, त्यांचे वडील तुफानी सरोज हे तीन वेळा खासदार राहिले आहेत आणि सध्या ते आमदार आहेत. वाराणसी येथे जन्मलेल्या प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले असून, पुढील शिक्षण त्यांनी अमिटी विद्यापीठातून घेतले आहे. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होत्या.
हे ही वाचा -
