लखनौ : आशिया कप 9 सप्टेंबरपासूनसुरु होणार आहे. रिंकूसिंगचाटीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. रिंकूसिंगनं यूपी टी 20 लीग मध्ये दमदार शतक केलं. रिंकूनं मेरठ मैवरिक्सनंगोरखपूरलायन्सला 6 विकेटनं पराभूत केलं. आशिया कपसाठीटीम इंडियात रिंकूसिंगचा समावेश केल्यानं तर्क वितर्क सुरु झाले होते. अनेकांनी रिंकूसिंगच्या समावेशाबद्दल टीका केली होती. आता रिंकूसिंगनं दमदार शतक करत टीकाकारांना गप्प केलं आहे. रिंकूसिंगनंगोरखपूरविरुद्ध 48 बॉलमध्ये 108 धावा केल्या. रिंकूनं स्वत:च्या फलंदाजीच्या जोरावर मेरठला पराभवाच्या छायेतून बाहेर काढत विजय मिळवून दिला.
रिंकूची आक्रमक फलंदाजी, मेरठचा विजय
गोरखपूरनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 167 धावा केल्या होत्या. गोरखपूरसाठी सर्वाधिक धावा कॅप्टन ध्रुव जुरेलनं केल्या होत्या. जुरेलनं 38 धावा केल्या. मेरठकडून विशाल चौधरी आणि विजय कुमारनं तीन तीनविकेट गमावल्या. 168 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मेरठची सुरुवात खराब झाली. मेरठनं 8 ओव्हरमध्ये 38 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर संघाची जबाबदारी कॅप्टनरिंकूसिंगवर होती. रिंकूसिंगनं मेरठच्या संघाला निराश केलं नाही. रिंकूसिंगनं दमदार शतक केलं. यामुळंमेरठनं गमावलेला सामना जिंकला.
रिंकूसिंगनं 48 बॉलमध्ये 225 च्या स्ट्राइकरेटनं 108 धावा केल्या. रिंकूसिंगनं या डावात 7 चौकार आणि 8 षटकार मारले. रिंकूसिंगनं पाचव्या विकेटसाठीसाहबयुवराजसोबत नाबाद 130 धावांची भागीदारी केली. युवराजनं 22 बॉलमध्ये 22 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीमुळंमेरठनंगोरखपूरला 6 विकेटनं पराभूत केलं.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळवणार?
रिंकूसिंगकडे आशिया कपच्या माध्यमातून टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळवण्याची संधी आहे. 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्येभारतानं विजेतेपद मिळवलं होतं, त्यावेळीरिंकूसिंग राखीव खेळाडू होता. आता आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केल्यास रिंकूसिंगला पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या संघात स्थान मिळू शकतं.
आशिया कपसाठी भारताचा संघ :
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन ), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना
