RCB vs MI Update IPL 2026 : शेवटच्या क्षणी पलटला गेम! क्रुणाल पांड्याने एकहाती जिंकून दिला RCB ला थरारक विजय, मुंबई इंडियन्स 2 विकेटने पराभूत
Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Live Update : बंगळूरु विरुद्ध मुंबई यांच्यात रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मैदानावर जोरदार भिडंत होणार आहे.
किरण महानवरLast Updated: 10 May 2026 11:49 PM

पार्श्वभूमी
Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएल 2026 मध्ये आजच्या डबल हेडरमधील दुसरा सामना भन्नाट रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध मुंबई इंडियन्स...More
Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएल 2026 मध्ये आजच्या डबल हेडरमधील दुसरा सामना भन्नाट रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मैदानावर जोरदार भिडंत होणार आहे. या सामन्याकडे फक्त चाहत्यांचेच नाही, तर संपूर्ण पॉइंट्स टेबलचे लक्ष लागले आहे.आरसीबीसाठी हा सामना टॉपवर झेप घेण्याची सुवर्णसंधी आहे. 10 पैकी 6 सामने जिंकून संघाचे 12 गुण झाले आहेत आणि नेट रनरेटही जबरदस्त आहे. आज मुंबईवर विजय मिळवला तर बेंगळुरू थेट गुणतालिकेच्या अव्वल स्थानावर पोहोचू शकते. मात्र सलग दोन पराभवानंतर संघावर दबाव वाढला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी ही अक्षरशः ‘करो या मरो’ लढाई आहे. 10 पैकी फक्त 3 विजय मिळवलेल्या MI ला प्लेऑफची आशा जिवंत ठेवायची असेल तर उरलेले सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. आजचा पराभव म्हणजे स्पर्धेतून जवळपास बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते.रायपूर पिच रिपोर्टरायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर शेवटचा आयपीएल सामना 2016 मध्ये झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना या खेळपट्टीचा फारसा अनुभव नाही. आजचा सामना फ्रेश पिचवर खेळवला जाणार आहे. रायपूरची विकेट साधारणपणे संथ मानली जाते, पण आजच्या पट्टीवर फलंदाजांना चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी पाऊस झाल्यामुळे सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि बाऊन्स मिळू शकतो. मात्र जसजसा सामना पुढे जाईल तसतशी विकेट मंदावण्याची शक्यता आहे.स्पिनर्सनाही काही प्रमाणात मदत मिळेल, पण सपाट विकेटमुळे मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. त्यातच रात्री दव पडण्याची शक्यता असल्याने टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.हे ही वाचा -अवघं 15 वय, पण जिद्द आकाशाला गवसणी घालणारी! वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक धमाका, मोडले जगातले सगळे रेकॉर्ड्स, रचला नवा इतिहास
RCB vs MI Update IPL 2026 : शेवटच्या क्षणी पलटला गेम! क्रुणाल पांड्याने एकहाती जिंकून दिला RCB ला थरारक विजय, मुंबई इंडियन्स 2 विकेटने पराभूत
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने मुंबई इंडियन्सला दोन गडी राखून पराभूत केले.
रविवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत सात गडी गमावून 166 धावा केल्या.
प्रत्युत्तर, आरसीबीने कृणाल पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित षटकांत आठ गडी गमावून 167 धावा केल्या आणि सामना जिंकला.
मुंबईकडून कॉर्बिन बॉशने चार आणि दीपक चहरने दोन बळी घेतले, तर गझनफर आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.