RCB vs GT Final Live Update : बंगळुरुने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांचा जिंकली IPL ची ट्रॉफी

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Final IPL 2026 Marathi News : जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग आयपीएलचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 31 May 2026 11:46 PM

पार्श्वभूमी

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Final IPL 2026 Marathi News : जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग आयपीएलचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2026 चा महाअंतिम...More

विराट कोहलीची नाबाद 75 धावांची धडाकेबाज खेळी, गुजराविरुद्धच्या अंतिम सामन्यात बंगळुरुचा दणदणीत विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने आयपीएल 206 चे विजेतेपद पटकावले आहे. हे त्यांचे सलग दुसरे आयपीएल विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने 18 व्या षटकातच लक्ष्य पूर्ण करून इतिहास रचला. विराट कोहलीने नाबाद 75 धावांची खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात सलग दोन हंगामांसाठी आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने आणि मुंबई इंडियन्सने पराक्रम केला होता. आता, 2025 चे विजेतेपद पटकावल्यानंतर, बंगळूरने 2026 चे विजेतेपद जिंकून या विशेष यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.