RR vs GT IPL 2026 Ravindra Jadeja Celebration : आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने गुजरातचा धडाकेबाज फलंदाज जॉस बटलरला बाद करताच मैदानात केलेल्या सेलिब्रेशनने सोशल मीडियावर खळबळ उडवली.

Continues below advertisement

जडेजाचं विचित्र सेलिब्रेशन चर्चेत

सामन्याच्या 14व्या षटकात बटलर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. जडेजाने टाकलेल्या फुल लेंथ चेंडूवर बटलरने लॉन्ग-ऑफच्या दिशेने हवेत फटका खेळला, मात्र चेंडू नीट टाइम झाला नाही. त्यानंतर डोनोव्हन फेरेराने सहज झेल घेत बटलरचा डाव संपवला. पण खरी चर्चा विकेटनंतर सुरू झाली. बटलर पॅव्हेलियनकडे परतत असताना जडेजाने हात खिशाकडे नेत असा इशारा केला, जणू त्याने बटलरला खिशात टाकलं आहे. हे सेलिब्रेशन काही चाहत्यांना प्रचंड आक्रमक आणि अपमानास्पद वाटलं.

Continues below advertisement

जडेजाचा बटलरवर कायम दबदबा 

विशेष म्हणजे, टी-20 क्रिकेटमध्ये जडेजा नेहमीच बटलरवर भारी पडला आहे. आतापर्यंत या दोघांमध्ये 12 वेळा सामना झाला असून जडेजाने बटलरला तब्बल 3 वेळा बाद केलं आहे. बटलरने जडेजाच्या 66 चेंडूंवर फक्त 82 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 124.24 इतकाच राहिला आहे. कदाचित हाच दबदबा दाखवण्यासाठी जडेजाने हे हटके सेलिब्रेशन केलं असावं. मात्र आता या एका इशाऱ्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे.

जयपूरमध्ये 'गिल' वादळ! गुजरातचा राजस्थानसमोर 230 धावांचा डोंगर

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2026 च्या 52 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 230 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा राजस्थानचा निर्णय गुजरातच्या फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. सलामीवीर आणि कर्णधार शुभमन गिलने अवघ्या 44 चेंडूंत 84 धावांची (9 चौकार, 3 षटकार) स्फोटक खेळी केली. त्याला साई सुदर्शनने 55 धावा करून उत्तम साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी करून पाया रचला.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थानचे गोलंदाज आज पूर्णपणे दबावाखाली दिसले. जॉफ्रा आर्चर (46 धावा) आणि तुषार देशपांडे (52 धावा) अत्यंत महागडे ठरले. ब्रिजेश शर्माने 2 बळी घेतले, तर रवींद्र जडेजा आणि यशराज पुंजा यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला. गुजरातने निर्धारित 20 षटकांत 4 गडी राखून 229 धावा फलकावर लावल्या.

हे ही वाचा -

BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?