England vs India 4th Test Update : भारत आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. गेल्या तीन सामन्यांपैकी भारताने फक्त एक सामना जिंकला आहे आणि दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 ने पुढे आहे. भारताने पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 2 विकेट गमावून 225 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसांचा खेळ सुरू झाला आहे आणि यजमान संघ वेगाने 300 धावांच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि भारताला फक्त दोन विकेट्स मिळाल्या आहेत. टीम इंडियाचे गोलंदाज निष्प्रभ असल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान, रवींद्र जडेजाकडून रनआऊटची मोठी संधी हुकली. 

रनआउटची संधी हुकली! नेमकं काय घडलं?

मोहम्मद सिराजच्या 54 व्या षटकाच्या शेवटचा चेंडू रूटने गलीच्या दिशेने खेळला, पण चेंडू सरळ रवींद्र जडेजाकडे गेला, जो बॅकवर्ड पॉइंटवर उभा होता. परंतु तोपर्यंत ऑली पोप धाव घेण्यासाठी पळाला होता आणि रूटचे लक्ष चेंडूकडे होते, त्यामुळे त्याने पोपकडे पाहिले नाही. त्यावेळी दोन्ही फलंदाज एका एंडला होते, पण पोप जोरात ओरडला तेव्हा रूट पळाला, तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडला एक पण भारतीय खेळाडू आला नाही, आला असता तर रूट रन आऊट झाला असता. विशेष म्हणजे जडेजासारखा चपळा क्षेत्ररक्षक असूनही संधी हुकली, त्यामुळे रवींद्र जडेजा प्रचंड संतापला होता.

मोहम्मद सिराजने जखमेवर चोळले मीठ, गमावले दोन रिव्ह्यू

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिला रिव्ह्यू गमावला, जो मोहम्मद सिराजने आग्रह धरल्यानंतर शुभमन गिलने घेतला. पंचांनी जॅक क्रॉलीला नॉट आउट घोषित केले, परंतु सिराजला वाटले की चेंडू विकेटला लागेल. केएल राहुल कर्णधार गिलला समजावून सांगत होता की चेंडू विकेटला लागणार नाही, परंतु त्याने सिराजचे ऐकले. रिप्ले पाहिल्यावर स्पष्ट झाले की चेंडू विकेटला चुकवत आहे. अशा प्रकारे भारताने आपला रिव्ह्यू गमावला.

यानंतर, सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने दुसरा रिव्ह्यू गमावला, जो पाहुण्या संघाने जो रूटविरुद्ध घेतला. यावेळीही राहुलने गिलला रिव्ह्यू घेण्यापासून रोखले, परंतु सिराजसमोर त्याचे ऐकले गेले नाही. निकाल पुन्हा तोच होता, यावेळीही चेंडू विकेटला लागला नाही आणि भारताने रिव्ह्यू गमावला. अशा प्रकारे, टीम इंडियाने दोन रिव्ह्यू गमावले आहेत आणि आता त्यांच्याकडे फक्त एक डीआरएस शिल्लक आहे.  

हे ही वाचा - 

ICC Injury Rules : ऋषभ पंतमुळे कसोटी क्रिकेटमध्ये होणार 'क्रांतिकारी' बदल; नव्या नियमाबाबत चर्चा सुरू; महत्त्वाची अपडेट आली समोर