Ravindra Jadeja Tease Shardul Thakur Video : रविवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात शेवटच्या षटकात भन्नाट ड्रामा पाहायला मिळाला. राजस्थानच्या डावाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर आमनेसामने आले आणि त्यांच्यातील मजेशीर भांडण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं.
शेवटच्या षटकात काय घडलं?
मुंबईकडून शेवटचं षटक शार्दुल ठाकूर टाकत होता. चौथ्या चेंडूवर जडेजाने कव्हर्समध्ये फटका मारला, पण तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. विकेट मिळाल्याच्या आनंदात शार्दुलने जोरदार सेलिब्रेशनही सुरू केलं. मात्र, काही क्षणातच नो-बॉलचा सायरन वाजला आणि सगळंच चित्र बदललं. विकेट रद्द झाल्यानंतर जडेजा आणि शार्दुल दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं.
यानंतर पुढचा चेंडू फ्री-हिट होता. जडेजाने या संधीचा पुरेपूर फायदा घेत जोरदार चौकार ठोकला. चौकार मारल्यानंतर त्याने भन्नाट सेलिब्रेशन करत मजेशीर अंदाजात शार्दुलला चिडवलं. एवढंच नाही तर पुढच्याच चेंडूवर पुन्हा चौकार लगावत जडेजाने राजस्थानचा स्कोअर 200 पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात जडेजाने 11 चेंडूत 19 धावांची झटपट खेळी केली. त्याने नांद्रे बर्गरसह अवघ्या 12 चेंडूत 30 धावांची भागीदारी करत राजस्थानला 205 धावांपर्यंत पोहोचवलं. विशेष म्हणजे जडेजा आणि शार्दुल याआधी चेन्नई सुपर किंग्सकडून एकत्र खेळले असल्याने मैदानावरील ही मस्ती चाहत्यांना अधिकच आवडली.
हे ही वाचा -
