Ravindra Jadeja RR vs CSK IPL 2026 : आयपीएल 2026 मध्ये (IPL 2026) आज (30 मार्च) गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रोमांचक सामना रंगला. मात्र या सामन्याची सर्वात मोठी चर्चा ती म्हणजे रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) झाली. कारण तो यावेळी चेन्नईसाठी नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत मैदानात उतरला होता.
आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनपूर्वी जडेजाचा चेन्नईकडून राजस्थानमध्ये ट्रेड झाला होता. त्यामुळे ही त्याची घरवापसीच ठरली. जडेजाने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात 2008 आणि 2009 मध्ये राजस्थान रॉयल्सकडूनच केली होती. आणि आता पुन्हा त्या संघात परतताच त्याने दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
चेन्नईविरुद्ध जडेजाची चमकदार गोलंदाजी (Ravindra Jadeja RR vs CSK IPL 2026)
37 वर्षीय जडेजाने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के दिले. त्याने आधी चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सरफराज खानला एलबीडब्ल्यू करून 17 धावांवर माघारी पाठवले.
गोळ्या झाडत केलं फायरिंग सेलिब्रेशन, VIDEO (Ravindra Jadeja Firing celebration RR vs CSK IPL 2026)
यानंतर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने सुरुवातीलाच जडेजाच्या चेंडूवर षटकार ठोकला. पण जडेजाने लगेचच कमबॅक करत त्याच षटकात दुबेला कॅच आऊट करून बदला घेतला. दुबे फक्त 6 धावांवर बाद झाला. या विकेटनंतर जडेजाने केलेले ‘गन सेलिब्रेशन’ही चर्चेत राहिले. जडेजाने या सामन्यात 3 षटकांत केवळ 18 धावा देत 2 महत्त्वाचे विकेट घेतले आणि आपल्या जुन्या संघाविरुद्ध प्रभावी कामगिरी केली.
2023 चा ऐतिहासिक क्षण...
विशेष म्हणजे, 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला पाचवे विजेतेपद मिळवून देण्यात जडेजाचा सिंहाचा वाटा होता. अहमदाबादमध्ये झालेल्या फायनलमध्ये त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा करत सामना जिंकवला होता, पहिल्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले. आज मात्र तोच जडेजा चेन्नईसमोर उभा राहिला आणि आपल्या नव्या (पण जुन्याच) संघासाठी मॅच-विनिंग कामगिरी करत पुन्हा एकदा आपली किंमत सिद्ध केली.
हे ही वाचा -
