R Ashwin Ball Tampering News : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी कारण जरा वादग्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर अश्विनला अनेक समस्यांना तोंड देत आहे. अश्विन सध्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे आणि येथे तो आणखी एका वादात अडकलेला दिसतो. त्याच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच, अश्विनने मैदानावर पंचांवर राग व्यक्त केला ज्यासाठी त्याला शिक्षा झाली. अश्विनने पंचांशी वाद घातला आणि नंतर रागाच्या भरात त्याचे हातमोजे फेकले. आता तो बॉल टॅम्परिंगच्या आरोपात अडकलेला दिसतो. एका संघाने त्याच्यावर हे आरोप केले आहेत.
आर अश्विनवर 'या' संघाने केले आरोप...
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सेकेम मदुराई पँथर्सने 14 जून रोजी एससीएफ क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्सच्या अश्विनवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. फ्रँचायझीने टीएनपीएलमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. फ्रँचायझीने म्हटले आहे की, अश्विन आणि त्याच्या संघाने जे टॉवेल वापरले होते, ज्यावर एक विशेष प्रकारचे रसायन लावले गेले होते, ज्यामुळे चेंडूची चमक बदलली. त्यांनी म्हटले आहे की, वारंवार इशारा देऊनही अश्विन आणि त्याच्या संघाने ऐकले नाही.
पण, लीगचे सीईओ प्रसन्ना कन्नन यांनी अश्विनच्या संघावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, जर मदुराई पँथर्सकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. प्रसन्ना यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, "त्यांनी तक्रार दाखल केली आहे जी आम्ही पाहिली आहे आणि तक्रार स्वीकारली पण आहे. यासोबत त्यांना आरोपांबाबत पुरावे देण्यास सांगितले आहे. जर आम्हाला कोणतेही ठोस पुरावे मिळाले तर आम्ही एक स्वतंत्र समिती स्थापन करू. जर पुरावे नसतील तर खेळाडू आणि फ्रँचायझीवर असे आरोप करणे योग्य नाही.
14 वर्षे, 765 विकेट्स आणि 4394 धावा -
भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. अश्विनने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 सामना खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर आर अश्विनची दिग्गज क्रिकेटपटू म्हणून ओळख झाली. अश्विनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 287 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. अश्विनची ऐतिहासिक कारकीर्द 14 वर्षे चालली, ज्यामध्ये त्याने 765 विकेट्स घेण्यासोबतच 4394 धावाही केल्या.
हे ही वाचा -
