Dinesh karthik about Virat Kohli : भारतीय संघाचा (Team India) स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) मागील बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट जगतातून त्याच्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण विराटवर टीका करत असून काहीजण त्याचं समर्थन करत आहेत. भारतीय विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने कोहलीचं समर्थन केलं असू त्याने त्याला एक उत्तम अनुभव असलेला आणि यशस्वी खेळाडू सांगितलं आहे.
'स्पोर्ट्सकीडा'या स्पोर्ट्स वृत्तसंस्थने दिलेल्या माहितीनुसार कार्तिकने कोहलीला पाठिंबा देत त्याला संघाबाहेर ठेवणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला,''विराट एक अनुभवी खेळाडू असण्यासोबत यशस्वी क्रिकेटर आहे. आता तो विश्रांतीनंतर नक्कीच शानदार पुनरागमन करेल. अशामध्ये तुम्ही अशी क्षमता असणाऱ्या खेळाडूला संघाबाहेर करु शकत नाही.''
2019 पासून विराटची बॅट शांत
तब्बल 70 शतकं नावावर असलेल्या विराटला 2019 पासून एकही शतक ठोकता आलेलं नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने शतक ठोकलं होतं. ज्यानंतर कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे. पण इंग्लंड दौऱ्यातही विराट अजिबात खास कामगिरी करु शकला नसल्याचं दिसून आलं आहे.
हे देखील वाचा-
- Hardik Pandya : मर्यादीत षटकांमध्ये हार्दिक भारताचा 'स्टार खेळाडू,' माजी भारतीय क्रिकेटपटूकडून पांड्याचं कौतुक
- Sreesanth about Virat : 'विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मी खेळलो असतो तर संघाने विश्वचषक जिकला असता,' माजी गोलंदाज श्रीशांतचा दावा
- Rishabh Pant : ऋषभ पंत बनला मिर्झापुरमधील 'मुन्ना भैय्या', खास डायलॉगसह शेअर केला फोटो