PSL Ball-Tampering Row News : पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला आहे. बॉल टेम्परिंगसारखी गंभीर घटना समोर आल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात फखर जमान (Fakhar Zaman) यांच्यावर बॉलशी छेडछाड केल्याचा आरोप असून, ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही मोठी खळबळ उडाली आहे.
PSL 2026 मध्ये बॉल टेम्परिंगचा मोठा वाद (PSL Ball-Tampering Row)
हा प्रकार कराची किंग्ज विरुद्ध लाहोर कलंदर (Lahore Qalandars vs Karachi Kings) या सामन्यात घडला. गद्दाफी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या लो-स्कोरिंग सामन्याच्या अखेरच्या षटकात फखर जमान बॉलशी छेडछाड करताना दिसले. त्या वेळी कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ हेही त्याच्या जवळ उभा होता.
फखर जमान अडचणीत, शाहीन-रऊफवरही होणार कारवाई (PSL Shaheen Afridi Fakhar Zaman Ball-Tampering Row)
अखेरच्या षटकात लाहोर कलंदर्सला विजयासाठी 13 धावा वाचवायच्या होत्या. हारिस रऊफ गोलंदाजीसाठी सज्ज होण्याआधी शाहीन आणि फखर त्याच्यासोबत चर्चा करताना दिसला. सुरुवातीला हा नेहमीप्रमाणे रणनीतीवर नियोजन असल्याचे वाटले. मात्र त्याचवेळी फखर जमान बॉलशी छेडछाड करत असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब अंपायरच्या लक्षात आली आणि त्यांनी तत्काळ कारवाई करत लाहोर कलंदर्सवर 5 धावांची पेनल्टी लावली.
शाहीन अफ्रिदी बॉल टेम्परिंग वादवर काय म्हणाला? (PSL Shaheen Afridi on Ball-Tampering Row)
सामन्यानंतर या घटनेवर माजी क्रिकेटपटू रमीझ राजा याने शाहीन अफ्रिदी याला प्रश्न विचारला. त्यावर शाहीन म्हणाले, "मला खरंच याबद्दल काही माहिती नाही. जर हे कॅमेऱ्यात कैद झाले असेल, तर आम्ही त्यावर चर्चा करू. 5 धावांची पेनल्टी झाली, त्यावर आमचा काहीच उपाय नव्हता." दरम्यान, या प्रकरणाची चौकशी पुढे सुरू राहण्याची शक्यता असून, फखर जमानसह शाहीन अफ्रिदी आणि हारिस रऊफ यांच्यावरही पुढील कारवाई होऊ शकते.
हे ही वाचा -
