PSL 2026 Controversy Update : पाकिस्तान सुपर लीग (PSL) सुरू होऊन अवघे चारच दिवस झाले आहेत, पण या छोट्याशा कालावधीत स्पर्धा वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे. एकामागून एक असे 4 मोठे वाद उघडकीस आले आहेत, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? (PSL 2026 Controversy) 

सुरुवातीलाच पहिल्या सामन्यात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. व्हाईट बॉल खेळताना चेंडूचा रंगच बदलून गुलाबी झाल्याचं दिसलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या एका समालोचकाने इंग्लंडच्या समालोचकाचा थेट अपमान केल्यामुळे नवा वाद पेटला. 

शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप (Shaheen Afridi and Sikandar Raza)

तिसऱ्या सामन्यानंतर आणखी एक गंभीर प्रकरण समोर आलं. शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रजा या लाहोर कलंदर्सच्या खेळाडूंनी संघाच्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं उघड झालं. लाहोरमधील पाचतारांकित हॉटेलमध्ये सर्व संघ थांबले असताना, कडक बंदी असूनही त्यांनी बाहेरील पाहुण्यांना रात्री उशिरापर्यंत आपल्या खोलीत थांबू दिलं. पोलिस अधिकाऱ्यांनी याला गंभीर सुरक्षा त्रुटी मानलं आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्वसूचना आणि मनाई असूनही, शाहीन आणि सिकंदर यांनी रझाच्या आठव्या मजल्यावरील खोलीत रात्री दीड वाजेपर्यंत चार पाहुण्यांना ठेवले होते. लाहोर कलंदर्सच्या मीडिया अधिकाऱ्याने पाहुण्यांना रझाच्या खोलीत रात्री 10:35 पर्यंत आणि नंतर रात्री 11:00 वाजेपर्यंत राहण्याची परवानगी मागितली, परंतु दोन्ही विनंत्या नाकारण्यात आल्या. असूनही, चार पाहुणे रझाच्या खोलीत शिरले आणि रात्री दीड वाजेपर्यंत थांबले.

PSLमध्ये बॉल टेम्परिंग, नेमकं काय घडलं? (PSL Shaheen Afridi Fakhar Zaman Ball-Tampering Row)

या घटनेनंतर, त्याच संघाच्या एका सामन्यात बॉल टॅम्परिंगची घटनाही घडली, ज्यात आतापर्यंत फखर जमान दोषी आढळला आहे, तर शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनाही परिणामांना सामोरे जावे लागू शकते. यापूर्वी, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कपड्यांमुळे चेंडूचा रंग गुलाबी झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने इंग्लंडच्या एका माजी वेगवान गोलंदाजाचा अपमान केला होता.

हे ही वाचा -

Ajinkya Rahane : IPLच्या दुसऱ्याच दिवशी राडा! अजिंक्य रहाणे भडकला, ऑस्ट्रेलियन बोर्डाला घाम फुटला; कॅमेरून ग्रीनवरून हाय-व्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?