Prithvi Shaw Engagement With Akriti Agarwal : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आयुष्यातील नवी इनिंग सुरू केली आहे. तो बऱ्याच काळापासून आकृती अग्रवालला (Akriti Agarwal) डेट करत होता. आता या दोघांनी साखरपुडा करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. रविवारी (8 मार्च) पृथ्वीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर आकृतीसोबतचा साखरपुड्याचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वी पृथ्वी आणि आकृती यांना अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नसमारंभात एकत्र पाहण्यात आले होते. आता या दोघांनीही आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये व्हायरल
पृथ्वी शॉने इंस्टाग्राम पोस्टमध्ये खास कॅप्शन लिहिले आहे. तो म्हणाला, “मैदानावर षटकार मारण्यापासून ते आयुष्यभर हिट होण्यापर्यंत… तीच माझी परफेक्ट इनिंग आहे.” शेअर केलेल्या फोटोमध्ये पृथ्वी गुडघ्यावर बसून आकृतीला अंगठी घालताना दिसत आहे. आकृतीनेही हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
पृथ्वीच्या नव्या इनिंगची सुरुवात
पृथ्वी आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघेही चांगले मित्र आहेत आणि जवळपास एकाच काळात त्यांनी आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. अर्जुनचा साखरपुडा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाला होता आणि 5 मार्च रोजी त्याने सानिया चंडोकसोबत लग्नगाठ बांधली.
आकृती अग्रवाल कोण आहे? (Who Is Prithvi Shaw Akriti Agarwal)
आकृती अग्रवालच्या इंस्टाग्राम बायोनुसार ती एक अभिनेत्री आहे. याशिवाय ती फॅशन इन्फ्लुएंसर आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर म्हणूनही ओळखली जाते. इंस्टाग्राम रील्स आणि शॉर्ट व्हिडिओमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती काही म्युझिक व्हिडिओ आणि टीव्ही प्रोजेक्ट्समध्येही झळकली आहे. आकृती अनेक ब्रँड कोलॅबोरेशनचाही भाग राहिली आहे.
हे ही वाचा -
