Prithvi Shaw Sapna Gill Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण सध्या तो कायदेशीर प्रकरणात अडकला आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने छेडछाड प्रकरणात वेळेत जवाब न दिल्यामुळे शॉवर 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिल हिने (Social Media Influencer Sapna Gill Molestation Case) दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे. तिने शॉवर छेडछाड आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. 

Continues below advertisement

न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, दंड ठोठावला

या प्रकरणात पृथ्वी शॉने जवाब न दिल्यामुळे मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याला दंड ठोठावला आहे. ज्यामध्ये न्यायालयाने शॉला फेब्रुवारी ते जून पर्यंतचा वेळ दिला होता. 13 जून रोजी न्यायालयाने पृथ्वी शॉला जवाब दाखल करण्याची शेवटची संधी दिली होती, परंतु त्याच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. न्यायालयाने इशारा दिला की, "आताही एक शेवटची वॉर्निंग दिली जात आहे, परंतु 100 रुपये दंडासह."

Continues below advertisement

यानंतर, 9 सप्टेंबर रोजी न्यायालयाने शॉवर 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि त्याला जवाब दाखल करण्याची आणखी एक संधी दिली आहे, ज्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी 16 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण फेब्रुवारी 2023 चे आहे, जेव्हा मुंबईतील अंधेरी परिसरातील एका पबमध्ये पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात वाद झाला होता.

पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात सेल्फी काढण्यावरून झाला होता वाद 

फेब्रुवारी 2023 मध्ये, मुंबईतील एका हॉटेलमध्ये पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात सेल्फी काढण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर शॉवर हल्ला केल्याप्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आली होती, जे अजूनही जामिनावर आहेत. त्याच वेळी, या घटनेचा व्हिडिओ देखील बराच व्हायरल झाला. या घटनेनंतर, सपना गिलने पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, परंतु खटला दाखल झाला नाही, त्यानंतर तिने मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली. 

हे ही वाचा -

Ind vs UAE Asia Cup Pitch Report : दुबईची खेळपट्टी पाहून टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, प्लेइंग-11 निवडीसाठी 3 मोठे पेच