PCB Suspends Domestic Tournaments : भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आधी त्यांना पाकिस्तान सुपर लीग अनिश्चित काळासाठी रद्द करावी लागली आणि आता त्यांना देशांतर्गत स्पर्धा देखील पुढे ढकलाव्या लागल्या. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होत आहे. असे असूनही, पाकिस्तान त्याच्या कारवायांपासून थांबत नाही आणि सीमेपलीकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. याचा फटका त्यालाच सहन करावा लागतो. यामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे भविष्य धोक्यात आले आहे. पीएसएलनंतर देशांतर्गत अनेक स्पर्धा रद्द झाल्यामुळे पीसीबीच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
पीसीबीने 3 देशांतर्गत स्पर्धा थांबवल्या...
सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रेसिडेंट्स ट्रॉफी ग्रेड-II, प्रादेशिक आंतर-जिल्हा चॅलेंज कप, आंतर-जिल्हा अंडर-19 एकदिवसीय स्पर्धा तात्काळ प्रभावाने पुढे ढकलल्या आहेत. पीसीबीने शनिवारी (10 मे) आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यावर स्पर्धा पुन्हा सुरू केली जाईल. यासाठी सुधारित वेळापत्रक शेअर केले जाईल".
पीएसएल 2025 अनिश्चित काळासाठी रद्द
यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएल 2025 अनिश्चित काळासाठी रद्द केले होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता बोर्डाने हा निर्णय घेतला होता. यापूर्वी, पीसीबीने पाकिस्तानबाहेर यूएईमध्ये पीएसएल आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु यूएईने नकार दिल्यानंतर पीसीबीने ही लीग पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलली. जेव्हा पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हल्ला केला, तेव्हा भारताने योग्य उत्तर दिले आणि ड्रोनने पाकिस्तानवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यामुळे रावळपिंडी स्टेडियमचे बरेच नुकसान झाले आणि पीसीबीला पीएसएल सामने तात्काळ थांबवावे लागले.
परदेशी खेळाडू म्हणाले- पाकिस्तानात येणार नाहीत
भारत आणि पाकिस्तानमध्ये सतत होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे पीएसएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू खूप घाबरले होते. काही खेळाडू तर रडू लागले. बांगलादेशी खेळाडू रिशाद हुसेनने हा खुलासा केला. तो म्हणाला, “जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव वाढू लागला, तेव्हा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेलने मला सांगितले की तो कधीही पाकिस्तानात येणार नाही”. तर रिषद म्हणाला, सॅम बिलिंग्ज, डॅरिल मिशेल, कुसल परेरा, डेव्हिड व्हिसा, टॉम करन सारखे अनेक परदेशी खेळाडू खूप घाबरले होते.
हे ही वाचा -