एक्स्प्लोर

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?

Pakistan Cricket News : इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ आणि व्यवस्थापनात मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.

Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ आणि व्यवस्थापनात मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. सात खेळाडूंना आधीच संघाबाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता निवड समितीतील आणखी एका मोठ्या नावावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. माजी कसोटीपटू आणि राष्ट्रीय निवड समितीतील सदस्य आकिब जावेद यांचीही निवड समितीतून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. 

आकिब जावेद यांचीही निवड समितीतून हकालपट्टी?

पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकिब जावेद यांना राष्ट्रीय निवड समितीतील जबाबदारीतून मुक्त करून लाहोरमधील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये विकास संचालक म्हणून काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाऊ शकते. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आकिब जावेद यांच्या भूमिकेत बदल करण्याचा निर्णय पीसीबीकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या निवड समितीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

रिझवानसह 7 खेळाडूंना आधीच बाहेरचा रस्ता

इंग्लंड दौऱ्यातील घडामोडींमध्ये पाकिस्तानने मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक आणि सलमान अली आगा यांच्यासह सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवले. या निर्णयानंतर पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापन आणि निवड समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. सूत्रांच्या दाव्यानुसार, रिझवान आणि इमाम यांना केवळ खराब फॉर्ममुळेच संघाबाहेर करण्यात आले नाही, तर ड्रेसिंग रूममधील त्यांच्या वर्तनाचाही विचार करण्यात आला. सलमान अली आगा यांच्यावरही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या बदलांची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा रंगली.

माइक हेसन यांच्या एका निर्णयाने चार खेळाडू बदलले

पाकिस्तानच्या टेस्ट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्या शिफारशीनंतर आणखी चार खेळाडूंना संघातून परत पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हेसन यांना इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानच्या टेस्ट संघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी संघाचा समतोल साधण्यासाठी काही बदल करण्याचा निर्णय घेतला. हेसन यांनी बर्मिंगहॅममध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, रिझवान, इमाम आणि सलमान यांना संघातून वगळण्याचा निर्णय त्यांच्या जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यामुळे या तिघांना संघाबाहेर करण्याच्या निर्णयाशी आपला थेट संबंध नसल्याचे हेसन यांनी स्पष्ट केले.

मिस्बाह-उल-हक यांनीही पद सोडण्याची तयारी दर्शवली?

पाकिस्तान क्रिकेटमधील बदलांची व्याप्ती आता निवड समितीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि निवड समितीतील सदस्य मिस्बाह-उल-हक यांनीही पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे इंग्लंड दौरा संपल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून नवीन निवड समितीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा -

Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2027 ODI World Cup India : वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?
वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?
IND vs WI 1st T20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात होणार बदल; ODI संघामधील 13 खेळाडू OUT, अशी असेल Playing XI
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात होणार बदल; ODI संघामधील 13 खेळाडू OUT, अशी असेल Playing XI
IND vs WI 1st T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी OUT, संजू-अभिषेक सलामीला; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय खेळाडूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
वैभव सूर्यवंशी OUT, संजू-अभिषेक सलामीला; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय खेळाडूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
IND vs WI 1st T20 : टीम इंडियाच्या सामन्याची वेळ बदलली! वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-20 सामना किती वाजता होणार सुरू?, जाणून घ्या A टू Z
टीम इंडियाच्या सामन्याची वेळ बदलली! वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-20 सामना किती वाजता होणार सुरू?, जाणून घ्या A टू Z
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Embed widget