PBKS vs GT IPL 2026 : प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले

Punjab Kings wins by three wickets VS GT IPL 2026 : आयपीएल 2026 मध्ये यंदा प्रचंड धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यात मोठमोठे स्कोअर होत असल्याने चाहत्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे.

किरण महानवरLast Updated: 31 Mar 2026 11:29 PM

पार्श्वभूमी

Punjab Kings vs Gujarat Titans Update IPL 2026 In Marathi :पंजाब किंग्सने आयपीएल 2026 ची सुरुवात विजयाने केली. त्यांनी न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सला 3 गडी राखून पराभूत केले....More

PBKS vs GT IPL 2026 : प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले

पंजाब किंग्सने आयपीएल 2026 ची सुरुवात विजयाने केली. त्यांनी न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सला 3 गडी राखून पराभूत केले. पंजाब किंग्सकडून कूपर कॉनेलीने सामना जिंकून देणारी धावसंख्या उभारून सर्वाधिक धावा केल्या.


साई सुदर्शन आणि शुभमन गिलची चांगली सुरुवात


पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सची फलंदाजी काहीशी चढ-उताराची ठरली. पॉवरप्लेमध्ये साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात करत संघाला चांगली गती दिली. मात्र, ही जोडी मोठी भागीदारी उभी करण्यात अपयशी ठरली. पंजाबच्या स्टार ऑलराउंडर मार्को यानसन याने 37 धावांवर गुजरातला पहिला धक्का देत साई सुदर्शनला बाद केले. सुदर्शनने 11 चेंडूत 13 धावा केल्या. यानंतर गुजरातचा डाव सावरण्याची जबाबदारी शुभमन गिलवर होती. मात्र, आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्र चहल यांनी गिललाही माघारी धाडले. 10व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गिल मिडविकेटवर झेलबाद झाला. त्याने 27 चेंडूत 39 धावांची खेळी केली.


चहलने फिरवला गेम


यानंतर जोस बटलर आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैशाक विजयकुमारने फिलिप्सला 17 चेंडूत 25 धावांवर बाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला. त्यानंतर पुन्हा एकदा चहलने आक्रमण करत बटलरला 33 चेंडूत 38 धावांवर बाद केले. मधल्या फळीतही गुजरातची घसरण सुरूच राहिली. वॉशिंग्टन सुंदर 18 धावांवर बाद झाला, तर शाहरुख खान अवघ्या 4 धावांवर माघारी परतला. अखेरीस राहुल तेवतियाने नाबाद 11 धावा करत संघाला 20 षटकांत 6 बाद 162 धावांपर्यंत पोहोचवले.


पंजाब किंग्सची धक्कादायक सुरुवात


162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. प्रियांश आर्या अवघ्या 7 धावांवर कगिसो रबाडा यांच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर मात्र प्रभसिमरन सिंह आणि कूपर कोनोली यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. त्यांच्या वादळी खेळीमुळे पंजाबने पॉवरप्लेमध्ये 1 बाद 55 धावांपर्यंत मजल मारली. प्रभसिमरन चांगल्या लयीत दिसत होता, पण तो 37 धावांवर राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्या वेळी पंजाबचा स्कोर 2 बाद 83 असा होता.


 110-3 बाद वरून 6 बाद 118 अशी पंजाबची अवस्था, पण...


कर्णधार श्रेयस अय्यर यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र ते 18 धावांवर प्रसिद्ध कृष्णा यांच्या गोलंदाजीवर झेलबाद झाले. त्यानंतर नेहाल वढेरा केवळ 3 धावांवर वॉशिंग्टन सुंदर यांच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर पंजाबचा डाव पूर्णपणे कोलमडला. शशांक सिंह 4 धावांवर बाद झाला, तर त्याच षटकात प्रसिद्ध कृष्णा यांनी मार्कस स्टोइनिस यालाही शून्यावर बाद करत एकाच षटकात दोन धक्के दिले. पंजाबची अवस्था 110-3 बाद वरून 6 बाद 118 अशी झाली.


पण कॉनॉलीने किल्ला लढवला आणि संघाला विजय मिळवून दिला. कॉनॉली 44 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांसह 72 धावांवर नाबाद राहिला. प्रभसिमरन सिंगनेही 37 धावा केल्या. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने तीन बळी घेतले, तर रबाडा, अशोक, रशीद आणि वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.