एक्स्प्लोर

PBKS vs DC Live Update : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; पंजाब किंग्सवर 3 गडी राखून मात!

Punjab Kings vs Delhi Capitals Live Update In Marathi : आयपीएल 2026 च्या 55व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत.

LIVE

Key Events
PBKS vs DC Live Update IPL 2026 KL Rahul Axar Patel Priyansh Arya Prabhsimran Singh Shreyas Iyer Marathi News PBKS vs DC Live Update : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; पंजाब किंग्सवर 3 गडी राखून मात!
PBKS vs DC Update
Source : abp

Background

Punjab Kings vs Delhi Capitals Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएल 2026 च्या 55व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत. हा रोमांचक सामना धर्मशालातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्सची धुरा अक्षर पटेल सांभाळणार असून पंजाब किंग्सचे नेतृत्व पुन्हा एकदा श्रेयस अय्यरकडे असेल.  

धर्मशालाच्या मैदानावर यंदाच्या हंगामातील हा पहिलाच सामना असणार आहे. पंजाब किंग्ससाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण सलग तीन पराभवानंतर संघाची कामगिरी घसरलेली दिसत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला आता किमान दोन विजयांची नितांत गरज आहे.

17 मेपर्यंत पंजाब किंग्स धर्मशालामध्ये तीन सामने खेळणार असून घरच्या मैदानावर पुनरागमन करण्याची मोठी संधी त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे, खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सलाही विजयाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’सारखा ठरणार असून चाहत्यांना एक हायव्होल्टेज लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

23:29 PM (IST)  •  11 May 2026

PBKS vs DC Live Update : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; पंजाब किंग्सवर 3 गडी राखून मात!

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026च्या 55 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सवर 3 गडी राखून एक अविस्मरणीय विजय मिळवला.

216 धावांचे विशाल लक्ष्य दिल्लीने 19 व्या षटकातच पूर्ण केले.

21:39 PM (IST)  •  11 May 2026

PBKS vs DC Live Update : श्रेयस अय्यर अन् प्रियांश आर्याची फटकेबाजी; पंजाब किंग्सचे दिल्लीसमोर 211 धावांचे आव्हान

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2026 च्या 55 व्या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 210 धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर प्रियांश आर्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 211 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे.

पंजाबची दमदार सुरुवात

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र पंजाबच्या सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. प्रियांश आर्या (56 धावा, 33 चेंडू) आणि प्रभसिमरन सिंग (18 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची स्फोटक भागीदारी केली. प्रियांशने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 6 षटकार ठोकले.

कर्णधार श्रेयस अय्यरची 'कॅप्टन इनिंग'

सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने डावाची सूत्रे हाती घेतली. अय्यरने 36 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी करत संघाला द्विशतकी टप्पा ओलांडून दिला. त्याला मध्यफळीत कूपर कॉनोली (38 धावा) आणि शेवटच्या षटकांत सूर्यांश शेडगेने (8 चेंडूत 21* धावा) मोलाची साथ दिली.

दिल्लीच्या गोलंदाजांची कामगिरी

दिल्लीकडून मिचेल स्टार्क आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, मात्र ते धावगतीवर लगाम लावण्यास अपयशी ठरले. स्टार्कने 4 षटकांत 57 धावा दिल्या, मुकेश कुमारला 1 गडी बाद करण्यात यश आले. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK सामन्याआधीच 'नो हँडशेक' वादात नवा ट्विस्ट! पाकिस्तानी कर्णधारासोबत जय शाह यांचे हस्तांदोलन; नेमकं घडलं तरी काय?
IND vs PAK सामन्याआधीच 'नो हँडशेक' वादात नवा ट्विस्ट! पाकिस्तानी कर्णधारासोबत जय शाह यांचे हस्तांदोलन; नेमकं घडलं तरी काय?
Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात एन्ट्री होताच वैभवला दादाचा थेट इशारा; गांगुलीचे शब्द ऐकून सगळेच चक्रावले, नेमकं काय काय म्हणाला?
टीम इंडियात एन्ट्री होताच वैभवला दादाचा थेट इशारा; गांगुलीचे शब्द ऐकून सगळेच चक्रावले, नेमकं काय काय म्हणाला?
Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्समधूनही सूर्यकुमार यादव OUT? सगळ्यांत मोठा पुरावा समोर, दोन संघांमध्ये बोलणी सुरु, नेमकं काय घडतंय?
टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्समधूनही सूर्यकुमार यादव OUT? सगळ्यांत मोठा पुरावा समोर, दोन संघांमध्ये बोलणी सुरु, नेमकं काय घडतंय?
Ind vs Afg Test Live Day-3 : फॉलोऑन टाळता येणार का? अफगाणिस्तानसमोर मोठं आव्हान; भारताची नजर भक्कम आघाडीवर
Ind vs Afg Test Live Day-3 : फॉलोऑन टाळता येणार का? अफगाणिस्तानसमोर मोठं आव्हान; भारताची नजर भक्कम आघाडीवर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Nagpur Crime: नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Embed widget