Palash Muchhal News : गायक आणि चित्रपट दिग्दर्शक पलाश मुच्छल (Palash Muchhal) सध्या आणखी एका वादामुळे चर्चेत आले आहेत. याआधी क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. आता स्मृतीच्या एका मित्रासोबत 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप पलाशवर करण्यात आला आहे. विज्ञान माने नावाच्या व्यक्तीने पलाशने पैसे परत न केल्याचा आरोप केला आहे. मात्र या सर्व आरोपांवर पलाश मुच्छल याने अखेर मौन सोडत सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
चित्रपटात गुंतवणुकीपासून वादाची सुरुवात...
या प्रकरणाची सुरुवात एका चित्रपटातील गुंतवणुकीच्या चर्चेतून झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सांगली येथील रहिवासी असलेल्या विज्ञान मानेची ओळख स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांनी पलाश मुच्छलशी करून दिली होती. वैभव आणि स्मृती हे मित्र असल्याचेही सांगितले जाते. डिसेंबर 2023 मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती.
चित्रपटासाठी 40 लाखांची गुंतवणूक
पलाश मुच्छलने विज्ञान मानेला नजरिया या चित्रपटात गुंतवणूक करण्याची ऑफर दिली होती. चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर नफा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार विज्ञान याने कथितपणे 40 लाख रुपये गुंतवले. मात्र हा चित्रपट कधीच तयार झाला नाही. चित्रपट न बनल्याने आणि प्रदर्शित न झाल्याने वैभव यांनी पैसे परत मागितले. अनेक महिने प्रतीक्षा करूनही रक्कम न मिळाल्याने त्याने अखेर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. पैसे दिल्याचे पुरावे असलेली कागदपत्रेही त्याने पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत.
पलाश मुच्छल काय म्हणाला?
पलाश मुच्छल म्हणाला की, "मी सांगू इच्छितो की सांगलीच्या विज्ञान मानेने याने सोशल मीडियावर माझ्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे असून त्यात कोणतंही तथ्य नाही. माझी प्रतिमा मलिन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. माझे वकील श्रेयांश मिथरे यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील",
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. ठरलेल्या तारखेला लग्नाच्या विधीही सुरू झाले होते. मात्र त्याच दरम्यान स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली. त्यानंतर काही दिवसांतच अधिकृत निवेदन देत लग्न रद्द झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हे ही वाचा -