एक्स्प्लोर

Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलांना सौम्य अटॅक, बीपी वाढला पण सध्या प्रकृती स्थिर; डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Palaash Muchhal Smriti Mandhana Wedding : श्रीनिवास मानधना यांना एक दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून उद्या कुटुंबीयांशी चर्चा करून पुढील उपचार सुरू करण्यात येतील असं डॉक्टरांनी सांगितलं.

Smriti Mandhana Father Health : भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना (Srinivas Mandhana) यांचा बीपी वाढला होता आणि सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं दिसून आलं. त्यामुळे स्मृती आणि पलाश मुच्छलचे आज होणारे लग्नही पुढे ढकलण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांवर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून एक ते दोन दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा रविवारी सांगलीत शाही विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र विवाहाआधी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली. शारीरिक तणावामुळे त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Srinivas Mandhana Health Update : अँजिओग्राफी करावी लागण्याची शक्यता

स्मृतीच्या वडिलांना उपचारासाठी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचार सुरू असताना त्यांचा बीपीही वाढला होता. त्यामुळे श्रीनिवास मानधना यांच्यावर आता अंजिओग्राफी करावी लागू शकते असं डॉ. नमन शाह यांनी सांगितलं. श्रीनिवास मानधना यांना या आधी कोणतेही आजार नव्हते.

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Postponed : स्मृतीचे लग्न पुढे ढकललं

रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्रीनिवास मानधना यांच्या छातीत कळ आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता होणारे लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती स्मृतीच्या कुटुंबीयांनी दिली. लग्नाची पुढची नेमकी तारीख मात्र अद्याप स्पष्ट नाही. श्रीनिवास मानधना यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांकडून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होतं, आणि तो रोमँटिक क्षणही व्हायरल झाला होता. 

या दोघांचा आणखी एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोघेही सलमान खानच्या सलाम-ए-इश्क चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'तेनू लेके मैं जावांगा...' या गाण्यावर डान्स करताना दिसत होते. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
IPL Playoff Scenario 2026: मुंबई इंडियन्सच्या हातात 3 संघांचे भवितव्य; आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
मुंबई इंडियन्सच्या हातात 3 संघांचे भवितव्य; आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
Team India ODI Squad Vs Afghanistan: बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
Team India Test Squad Vs Afghanistan: बुमराह, जडेजा OUT...मानव सुतार, हर्ष दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
बुमराह, जडेजा OUT...सुतार, दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!

व्हिडीओ

Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Embed widget