PAK vs ENG 1st Test:  पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात रावलपिंडी स्टेडियममध्ये (Rawalpindi Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. पण अखेरीस ओली रॉबिन्स आणि अँडरसनच्या भेदक माऱ्यापुढं पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. हा सामना इंग्लंडच्या संघानं 74 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी 342 धावांची गरज होती. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 268 धावांवर ढेपाळला. महत्वाचं म्हणजे, इंग्लंडच्या संघानं तब्बल 22 वर्षानंतर पाकिस्तानला त्यांच्या मायदेशात कसोटी सामन्यात नमवलं.


पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात साऊद शकलीनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 159 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तर, इमाम उल हकनं 48 धावांचं योगदान दिलं. याशिवायस, सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि अजहर अलीनं क्रमश:48 आणि 40 धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघाला 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय. 


ट्वीट-






 


ट्वीट-







ओली रॉबिन्स, अँडरसनची घातक गोलंदाजी
इंग्लंडसाठी ओली रॉबिन्स आणि अँडरसननं चांगली गोलंदाजी केलीय. या सामन्यात ओली रॉबिन्स आणि अँडरसनच्या जोडीनं प्रत्येकी सहा-सहा विकेट्स घेतल्या. याशिवाय, बेन स्टोक्स आणि जॅक लीच प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळाली. या सामन्यात ओली रॉबिनसननं 22 षटकात 50 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. तर जिम्मी अँडरसननं 24 षटकात 36 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. पाकिस्तान आणि इंग्लंडनं यांच्यातील पुढील सामना 9-13 डिसेंबर महिन्यात खेळला जाणार आहे. या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना 17-21 डिसेंबरमध्ये कराची येथे खेळला जाईल. 



हे देखील वाचा-